विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन, राज ठाकरेंचा एकदिवसीय नागपूर दौरा, राजकीय भेटींची शक्यता
राज ठाकरे एकदिवसीय नागपूर दौऱ्यावर...
मुंबई : विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन (Assembly Winter session 2022) सुरु आहे. आज अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाचे नेते नागपुरात आहेत. अशात मनसे अध्यक्ष राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर (Raj Thackeray Nagpur Daura) जाणार आहेत. उद्या ते नागपुरात असतील. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय.
राज ठाकरेंचा नागपूर दौरा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाढीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे नागपूर दौरा करणार आहेत. उद्या ते नागपुरात दाखल होती. त्यानंतर ते मनसेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतील. पक्षाच्या वाढीसाठी, विस्तारासाठी काय करता येईल, याबाबत चर्चा करतील. स्थानिक प्रश्न काय आहेत? ते सोडवण्यासाठी काय उपाय करता येतील, याबाबतही ते मनसौनिकांशी चर्चा करतील. तसंच नव्या शाखाध्यक्षांना नियुक्ती पत्र देतील.
सध्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरु आहे. सर्वच राजकीय पक्षाचे नेते नागपुरात आहेत. अशात राज ठाकरेंचा नागपूर दौरा चर्चेचा विषय आहे.
राज ठाकरे यांची इतर पक्षाच्या नेत्यांशी चर्चा होणार का? हे पाहणं महत्वाचं असेल.
याआधीही काही दिवसांआधी राज ठाकरेंनी नागपूर दौरा केला होता. 18 सप्टेबरला ते नागपूर दौऱ्यावर होते. तेव्हा त्यांनी मनसे नेत्यांना मार्गदर्शन केलं होतं. तेव्हा त्यांनी नागपुरातील भाजप नेत्यांची भेट घेतली होती. आता या दौऱ्यात ते कुणाची भेट घेणार हे पाहणं महत्वाचं असेल.