Raj Thackeray : राज ठाकरे यांच्या घरात गणेशोत्सवात एक आनंदाची बातमी
राज ठाकरे यांचा नातू छोटा किआनला हा आनंद यावर्षी किती मिळेल, हे सांगता येत नाही, पण मोठा झाल्यानंतर प्रत्येक वर्षी आनंदाची पर्वणी त्याच्यासाठी नक्कीच असणार आहे.
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या घरात, गणेशोत्सवाचा (Ganeshotshav) आनंद आणखी वाढणार आहे. राज ठाकरे यांच्या घरात सर्वात लाडका नातू किआन आल्यानंतर घरात मोठा उत्सव आहे. विशेष म्हणजे ठाकरे घराण्यात पहिल्यांदाचं असा क्षण आहे. अमित ठाकरे (Amit Thackeray)यांना मुलगा झाला, राज ठाकरे आजोबा झाले, हा सर्वोच्च आनंदाचा क्षण राज ठाकरे यांच्यासाठी नक्कीच होता. कोरोनाच्यानंतर राज ठाकरे यांच्या घरी मोठ्या उत्साहात गणेश उत्सव साजरा करणार आहेत.
पण राज ठाकरे यांच्या घरी नातू छोटा किआन आल्यानंतरचा हा पहिला गणेशोत्सव मोठा साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांच्या घरी तयारी सुरु झाली आहे. ही ठाकरे परिवारासाठी आनंदाची बातमी मानली जात आहे. मागच्याा काही दिवसांपासून राज ठाकरे यांची राजकारणात अधिक चर्चा आहे. तसेच यावर्षी अधिक मान्यवर मंडळी त्यांच्या घरी गणपतीला भेट देखील देणार आहेत.
कारण ठाकरे यांच्याकडे घट असतात, ते देखील शिवसेना भवनात, शिवसेना भवनात नवरात्रोत्सव साजरा होतो. पण राज ठाकरे यांच्या घरी पहिल्यांदाच दीड दिवसांसाठी चांदीच्या धातूची मुर्ती प्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. यामुळे राज ठाकरे आणि ठाकरे घराण्यासाठी, एवढंच नाही तर राज ठाकरे यांच्या चाहत्यांसाठी हा आनंदाच क्षण आहे.
राज ठाकरे यांचा नातू छोटा किआनला हा आनंद यावर्षी किती मिळेल, हे सांगता येत नाही, पण मोठा झाल्यानंतर प्रत्येक वर्षी आनंदाची पर्वणी त्याच्यासाठी नक्कीच असणार आहे. आजोबा राज ठाकरे, या राज साहेबांचे-साहेब किआन ठाकरे यांच्या आनंदातच राज ठाकरे यांना मोठा आनंद नक्कीच असेल.