राज ठाकरे औरंगाबादनंतर नाशिक दौऱ्यावर; अनंता सूर्यवंशींच्या कुटुंबीयांची भेट घेणार?

राज ठाकरे एक मे रोजी औरंगाबादमध्ये सभा घेणार आहेत. या सभेनंतर दोन मेला ते नाशिक दौऱ्यावर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज ठाकरे औरंगाबादनंतर नाशिक दौऱ्यावर; अनंता सूर्यवंशींच्या कुटुंबीयांची भेट घेणार?
राज ठाकरे Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 30, 2022 | 8:00 AM

मुंबई :  एक मे रोजी राज ठाकरे (Raj Thackeray) यांची औरंगाबादमध्ये (Aurangabad) सभा आहे. या सभेनंतर मनसे (mns) अध्यक्ष राज ठाकरे हे दोन तारखेला नाशिकला  जाण्याची शक्यता आहे. औरंगाबादचा दौरा आटपून राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मिळत आहे. राज ठाकरे आपल्या या दौऱ्यात मनसे नेते अनंता सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्याची शक्यता आहे. अनंता सूर्यवंशी यांचे निधन झाले आहे, या पार्श्वभूमीवर राज ठाकरे सूर्यवंशी  यांच्या कुटुंबीयांची सात्वनपर भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर राज ठाकरे नाशिक मार्गे मुंबईला रवाना होतील. दरम्यान त्यापूर्वी राज ठाकरे आज पुण्याहून औरंगाबादला दाखल होणार आहेत. उद्या राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा आहे. या सभेपूर्वी ते आज मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत, तसेच सभेच्या तयारीचा देखील आढावा घेणार आहेत.

औरंगाबादमध्ये मनसेची जय्यत तयारी

उद्या एक मे रोजी राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. ही सभा सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे पहायला मिळत आहे. राज ठाकरे यांच्या सभेला पोलीस परवानगी मिळणार की नाही असा देखील प्रश्न होता. मात्र औरंगाबाद पोलिसांकडून काही अटींसह राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी देण्यात आल्याने सभेचा मार्ग मोकळा झाला आहे. उद्या राज ठाकरे यांची तोफ औरंगाबादमध्ये धडाडणार आहे. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह पहायला मिळत असून, सभेची जय्यत तयारी सुरू आहे.

राज ठाकरे काय बोलणार?

राज्या ठाकरे यांनी मुंबई आणि ठाण्यात झालेल्या दोनही सभेत भोंग्याचा आणि हिंदुत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी तीन मेचा अल्टिमेटम देखील देण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्या पहिल्या दोन सभेनंतर राजकारण चांगलेच तापले असून, आरोप,प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर उद्याच्या सभेत राज ठाकरे नेमकं काय बोलणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.