Raj Thackeray : भोंग्यांच्या मुद्द्यांवरुन राज ठाकरेंना धमकी? केंद्र सरकार सुरक्षा पुरवण्याची शक्यता

मशिदींवरील भोंगे काढले नाहीत तर त्यासमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा लावण्याचे आदेशच राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिलेत. अशावेळी पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया अर्थात पीएफआयने 'हमको छेडेंगे तो हम छोडेंगे नहीं' असा इशारा दिलाय. या पार्श्वभूमीवर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केंद्र सरकार सुरक्षा पुरवण्याची शक्यता आहे.

Raj Thackeray : भोंग्यांच्या मुद्द्यांवरुन राज ठाकरेंना धमकी? केंद्र सरकार सुरक्षा पुरवण्याची शक्यता
राज ठाकरे, मनसे अध्यक्षImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 4:26 PM

मुंबई : मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी राज ठाकरे यांनी राज्य सरकारला 3 मे पर्यंतचा अल्टिमेटमही दिलाय. इतकंच नाही तर मशिदींवरील भोंगे (Mosque Loudspeaker) काढले नाहीत तर त्यासमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा लावण्याचे आदेशच राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिलेत. अशावेळी पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया (Popular Front Of India) अर्थात पीएफआयने ‘हमको छेडेंगे तो हम छोडेंगे नहीं’ असा इशारा दिलाय. या पार्श्वभूमीवर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केंद्र सरकार सुरक्षा पुरवण्याची शक्यता आहे.

पीएफआयचा इशारा काय?

काही लोक वातावरण बिघडवण्याचं काम करत आहेत. काही लोकांना अजानची अडचण होतेय. काही लोकांना भोंग्यांची अडचण होतेय. काही लोकांना आपल्या मस्जिद आणि मदरशांची अडचण होत आहे. मी त्यांना एक सांगू इच्छितो, आम्हाला शांतता हवी आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा एक नारा आहे की हर मजदूर हमारा है. सोबतच आमचा दुसराही नारा आहे की, ‘हमको छेडो नहीं, हमको छेडेंगे तो हम छोडेंगे नहीं’. येवढं लक्षात ठेवा की, एक मदरसा, एक मस्जिद, एकाही लाऊडस्पीकरवर तुम्ही हात लावण्याचा प्रयत्न केला तर सर्वात पुढे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया दिसेल, अशा शब्दात पीएफआयचे नेते अब्दुल मतीन शेखानी यांनी इशारा दिलाय.

‘एसडीपीआय’च्या अझहर तांबोळींचा राज ठाकरेंना इशारा

सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे अझहर तांबोळी यांनी यावेळी मशिदींवरील भोंग्यांवरून होणाऱ्या राजकारणावर टीका केली. मशिदींच्या समोर भोंगे तुम्ही लावा, आम्ही भोंगे वाजवू, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. हिंदू ओवैसींना रोखण्यासाठी प्रयत्न करा, असेही ते यावेळी म्हणाले. त्याचबरोबर आम्ही मुस्लीम समाजाच्या बाजूने आहोत. मुस्लीम समाजाला व्हिक्टीम बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज ठाकरे जातीय दंगल घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. जर ते हिंदू ओवैसी आहेत तर त्यांना दाबून ठेवा. सगळे निर्बंध मुस्लीम समाजावर का? आम्ही घटनात्मक मार्गांने उत्तर देणार. पण अंगावर आलात तर सोडणार नाही, असा इशारा एसडीपीआय पार्टीच्या अझहर तांबोळी यांनी दिला आहे.

मशिदींवरील भोंग्यांबाबत राज ठाकरेंचा इशारा काय?

राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी तीनदा इशारा दिला आहे. मुंबईतील शिवाजी पार्कवरील सभा, त्यानंतर ठाण्यातील सभा आणि आता पुण्यातील पत्रकार परिषदेतून राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्याचा इशारा दिला आहे. भोंगे न हटवल्यास आम्ही जशास तसे उत्तर देऊ. मशिदीसमोरच हनुमान चालिसा लावू, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.

इतर बातम्या :

Kalyan BJP MNS Protest : येडे बिडे समजले का तुमी, कल्याण पालिकेवर भाजप-एमएनएसचा ‘तहान मोर्चा’, राजू, पाटील, रवींद्र चव्हाण आक्रमक

Girish Mahajan : ‘लायकी नसताना पक्षानं एकनाथ खडसेंना पद दिलं’, गिरीश महाजनांचा घणाघात; मानसिक संतुलन बिघडल्याचाही टोला

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.