राज ठाकरे चौथ्यांदा पुणे दौऱ्यावर, मनसेची विशेष रणनीती
मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा पुण्याचा दौरा करणार आहेत. उद्यापासून राज ठाकरे दोन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत. दोन दिवसीय दौऱ्यात राज ठाकरे पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Pune) पुन्हा एकदा पुण्याचा दौरा करणार आहेत. उद्यापासून राज ठाकरे दोन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत. दोन दिवसीय दौऱ्यात राज ठाकरे पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. शिवाय बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत .
महत्त्वाचं म्हणजे गेल्या महिनाभरातील राज ठाकरे यांचा हा चौथा पुणे दौरा आहे. राज ठाकरे हे 6 ऑगस्टलाही पुणे दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर आज त्यांनी पुन्हा पुणे दौऱ्याचं नियोजन केलं आहे.
राज ठाकरेंचा पुणे दौरा
ठाण्याचा दौरा झाल्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे 27 जुलैला पुण्यात दाखल झाले होते. राज ठाकरे 2 ऑगस्टपर्यंत पुणे आणि पिंपरी चिंचवड दौऱ्यावर होते. त्याआधीच्या आठवड्यात राज ठाकरे यांनी पुणे दौरा केला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Pune) हे 19,20 आणि 21 जुलै अशा तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी राज ठाकरेंचा पुढचा पुणे दौराही ठरला होता. आठ दिवसांनी म्हणजे 30 जुलैला राज ठाकरे पुन्हा पुणे दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांनी दिली होती. त्यानंतर आता राज ठाकरे आज पुन्हा पुणे दौऱ्यावर गेले आहेत.
नाशिकनंतर पुण्याच्या मैदानात
पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे पुन्हा अॅक्शन मोडमध्ये आल्याचं चित्र आहे. आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. नाशिकनंतर पुण्यात आलेल्या राज ठाकरे यांचा ‘राजसंवाद’ हा दौरा केला होता.
मनसे शाखाध्यक्षांसाठी भन्नाट ऑफर
दरम्यान, पुणे महापालिकेत मनसेची चांगली कामगिरी व्हावी म्हणून राज ठाकरे यांनी पक्षाच्या शाखाध्यक्षांसाठी भन्नाट ऑफरही दिली. चांगलं काम करणाऱ्या शाखाध्यक्षांच्या घरी मी जेवायला येईन, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. कार्यकर्त्यांमध्ये उभारी भरण्यासाठी राज यांनी ही ऑफर दिली आहे. सध्या पुण्यता मनसे कार्यकर्त्यांमध्ये या ऑफरची जोरदार चर्चा सुरू आहे.
45 जागा निवडून येणारच, मनसेचा दावा
दरम्यान, प्रभार रचनेमुळे पक्षाचे नगरसेवक कमी झाले असं मनसे नेते सांगतात. मात्र, शहरातील पक्ष संघटनेचा प्रभावही कमी झाला होता. आगामी 2022 च्या महापालिका निवडणुकीत मनसे सर्व जागा लढवणार आहे. त्यातील 90 जागांवर मनसेनं लक्ष केंद्रीत केल्याचं सांगतानाच 45 जागा निवडून येणारच असा दावा मनसेचे नेते करत आहेत.
पुणे महापालिकेतील पक्षीय बलाबल
भाजप – 99 राष्ट्रवादी – 42 काँग्रेस – 10 सेना – 10 मनसे – 2 एमआयएम – 1 एकूण जागा – 164
संबंधित बातम्या
VIDEO | अहो आश्चर्यम! बाबासाहेब पुरंदरेंच्या भेटीत राज ठाकरे चक्क मास्कमध्ये