Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली नारायण राणेंची भेट, राणेंवर लिलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया

शस्त्रक्रियेनंतर अनेक नेते नारायण राणे यांना भेटण्यासाठी जात आहेत. नारायणा राणे यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे राणे कुटुंबिय आणि डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहेत.

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली नारायण राणेंची भेट, राणेंवर लिलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली नारायण राणेंची भेटImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 28, 2022 | 5:55 PM

मुंबई : रंगशारदामधील कार्यक्रम आटोपल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) नारायण राणेंची (Narayan Rane) भेट घेण्यासाठी थेट लीलावती हॉस्पिटलमध्ये (Lilavati Hospital) पोहोचले. नारायण राणे यांच्यावर लिलावती रुग्णालयात अॅजिओप्लास्टी करण्यात आली आहे. शस्त्रक्रियेनंतर अनेक नेते नारायण राणे यांना भेटण्यासाठी जात आहेत. नारायणा राणे यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे राणे कुटुंबीय आणि डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वीच नारायण राणे रुटीन चेकअपसाठी लिलावती रुग्णालयात गेले होते. यावेळी त्यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या शिरांमध्ये ब्लॉक असल्याचं दिसलं डॉक्टरांनी सांगितलं तसेच त्यांची प्रकृती पाहता डॉक्टरांनी त्यांना अॅन्जिओप्लास्टी करण्याचा राणे यांना सल्ला दिला. त्यानुसार त्याचदिवशी त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली.

राणेंना नेमका त्रास काय होता?

राज ठाकरे आणि नारायण राणे यांची ही भेट जरी राजकीय भेट नसली तरी राज्याच्या राजकारणातले दोन दिग्गज नेते भेटल्याने सद्या चर्चा होत आहे. नारायण राणे यांना दोन स्टेंट्सची म्हणजे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमण्या आणि रक्तवाहिन्या दाबल्या जाऊ नये म्हणून बसवला जाणाऱ्या जाळीसारख्या छोटा गोलाकार तुकड्याची गरज आहे, असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले होते. त्यानुसान अॅन्जिओप्लास्टी करून ती बसवण्यात आली असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. तसेच यात स्टेंट बसवण्यात आलं, तर दुसरा स्टेंट नंतर बसवण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

ही पहिलीच शस्त्रक्रिया नाही

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना हा त्रास बऱ्यात दिवसांपासून आहे. आधीही राणे यांच्यावर याबाबत उपचार झाले आहेत. नारायण राणेंवर याआधीही अॅन्जिओप्लास्टी करण्यात आली आहे, अशी माहिती समोर आली आहे. 2009 मध्ये रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण झाल्यामुळे नारायण राणेंच्या छातीत दुखत होतं. तेव्हा ही पहिली शस्त्रक्रिया झाली होती. ती शस्त्रक्रिया देखील लिलावती रुग्णालयातच करण्यात आली होती, अशीही माहिती समोर आली आहे.

हे सुद्धा वाचा

दोन दिग्गजांच्या भेटीची चर्चा

काही महिन्यांपूर्वीच नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्यानंतर राणे जबरदस्त फॉर्मला आले आहेत. त्यांनी शिवसेनेला घेरण्याचा अनेकदा प्रयत्न केला आहे. तसेच आता राज ठाकरे यांनीही आगामी पालिका निवडणुकांआधी शिवसेनेविरोधात रणशिंग फुंकलं आहे. त्यानंतर राज ठाकरे यांचं कौतुक करताना राणे अनेकदा दिसून आले. भाजपनेही आता राज ठाकरेंच्याच सुरात सूर मिसळाला आहे. त्यामुळे या दोन बड्या नेत्यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चा तर होणारच.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.