Raj Thackeray : मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे यांची बैठक, पालिका निवडणुकीच्या अनुशंगाने घेतला जाणार आढावा
सध्या राज्यात पालिका निवडणुकीच्या अनुशंगाने अनेक पक्षांनी आत्तापासून आपली कंबर कसायला सुरुवात केली आहे. मागच्या पाच वर्षात पालिकेवरती शिवसेनेची सत्ता होती. परंतु त्यावेळी भाजप आणि शिवसेनेची युती होती.
मुंबई – मागच्या महिन्याभरापासून महाराष्ट्रातलं (Maharashtra) राजकीय चित्र पुर्णपणे बदललं आहे. नव सरकार राज्यात स्थापन झाल्यामुळे राजकीय समीकरण देखील बदललं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी जनतेच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. अद्याप मंत्रीमंडळाचा विस्तार झाला नसून घेतलेल्या निर्णयाची चर्चा अधिक आहे. तसेच शिंदे गटात रोज नव्याने कार्यकर्ते आणि नेते दाखल होत आहेत. त्याचबरोबर आरोप-प्रत्यारोप रोज सुरु आहेत. पालिकेच्या निवडणुकीवरती त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे सगळ्या पक्षांनी आत्तापासून त्याअनुशंगाने बैठका घ्यायला सुरुवात केली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीला घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थवर आज बैठक घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबईतील विधानसभा निहाय परिस्थितीचा राज ठाकरे स्वतः आढावा घेत आहेत. आज मध्य मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे बैठक घेणार आहेत. संघटनात्मक बांधणी, पक्षीय स्थिती, स्थानिक परिस्थिती तसेच निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणारे पदाधिकारी याबाबत बैठकीत आढावा घेतला जाणार आहे.
राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेचा फायदा हाईल का ?
अनेक दिवसांपासून शांत असलेल्या राज ठाकरेंनी मनसेच्या झालेल्या मेळाव्यात मशिदींवरील भोंगे बंद करण्याचे आदेश सरकारला दिले. तेव्हापासून राज ठाकरे पुन्हा चर्चेत आले. त्यावेळी त्यांचा मुद्दा अधिक गाजला. तसेच त्यांनी राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरात सभा देखील घेतल्या. सभा घेतल्यानंतर त्यांच्या सभेला लोकांची प्रचंड गर्दी होती. तेव्हापासून मनसे पुन्हा राज्यात सक्रीय झाली आहे. झालेल्या भाषणात राज ठाकरेंनी विरोधकांवरती आणि सत्ताधाऱ्यांवरती सडकून टीका केली. त्यांनी आपली भूमिका ठाम असल्याचे जाहीर केल्यानंतर मनसेच्या अनेक नेत्यांवरती राज्यभरात गुन्हे दाखल करण्यात आले.
आतापासून अनेक पक्षांनी आत्तापासून आपली कंबर कसायला सुरुवात केली आहे
सध्या राज्यात पालिका निवडणुकीच्या अनुशंगाने अनेक पक्षांनी आत्तापासून आपली कंबर कसायला सुरुवात केली आहे. मागच्या पाच वर्षात पालिकेवरती शिवसेनेची सत्ता होती. परंतु त्यावेळी भाजप आणि शिवसेनेची युती होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेससोबत युती केली. त्यामुळे बदलेल्या राजकारणामुळे मुंबई महापालिकेवरती कोणाची सत्ता येणार हे पाहावे लागेल.