शाहांचे पाय लागतील तिथे कमळ फुलतं, राणे समर्थक सात नगरसेवकांच्या राजीनाम्यानंतरही भाजप आशावादी

वैभववाडी नगरपंचायतीमधील 7 राणे समर्थक नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करत आहेत. (Rajan Teli Nitesh Rane)

शाहांचे पाय लागतील तिथे कमळ फुलतं, राणे समर्थक सात नगरसेवकांच्या राजीनाम्यानंतरही भाजप आशावादी
अमित शाह, नितेश राणे
Follow us
| Updated on: Feb 09, 2021 | 12:20 PM

सिंधुदुर्ग : वैभववाडीतील भाजपच्या सात नगरसेवकांनी राजीनामा देत शिवबंधन हाती बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार राजन तेली (Rajan Teli) यांनी मजबुतीने निवडणुकांना सामोरं जाण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांचे पाय जिथे लागतात, तिथे भाजपचं कमळ फुलतं, अशी प्रतिक्रिया तेलींनी व्यक्त केली. (Rajan Teli reacts on Nitesh Rane supporter Corporators joining Shivsena)

आरक्षण पडल्यानंतर आपल्याला पुन्हा उमेदवारी मिळणार नाही, याची चलबिचल झाल्याने भाजपच्या सात नगरसेवकांनी हे पाऊल उचलले आहे. वैभववाडीत भारतीय जनता पक्ष मजबूत आहे. दोन महिन्यांनंतर होणाऱ्या निवडणुकीत भाजप सर्व 17 जागांवर जिंकेल, असा विश्वास राजन तेली यांनी व्यक्त केला.

“शाहांच्या दौऱ्याने भाजप मजबूत”

भारतीय जनता पक्ष सिंधुदुर्गात मजबूत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आल्यानंतर भाजप आणखी मजबूत झाली आहे. अमित शाहांचे पाय जिथे जिथे लागतात, तिथे तिथे भारतीय जनता पक्षाचं कमळ फुलतं, हा देशातला इतिहास आहे. भाजप मजबुतीने उद्याच्या निवडणुकांना सामोरा जाईल, असंही राजन तेली म्हणाले.

अतुल रावराणेंचा राणेंच्या बुरुजाला सुरुंग

वैभववाडी तालुका आणि नगरपंचायतीवर एकहाती सत्ता असल्यामुळे वैभववाडी शहर हा आमदार नितेश राणेंचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र वैभववाडी नगरपंचायतीमधील 7 राणे समर्थक नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करत आहेत. शिवसेना नेते अतुल रावराणेंनी राणेंच्या बालेकिल्ल्यालाच सुरुंग लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

कोणाकोणाचा शिवसेना प्रवेश?

वैभववाडी नगरपंचायतीतील रवींद्र रावराणे, संजय चव्हाण, दीपा दीपक गजोबार, संपदा शिवाजी राणे, रवींद्र तांबे, संतोष पवार आणि स्वप्निल इस्वलकर हे सात नगरसेवक शिवसेनेचा भगवा झेंडा हाती धरत आहेत. (Rajan Teli reacts on Nitesh Rane supporter Corporators joining Shivsena)

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर हा पक्षप्रवेश होणार आहे नितेश राणे यांच्या वागण्याला कंटाळून ते शिवसेनेत प्रवेश करत असल्याची माहिती आहे. त्यामध्ये तीन माजी नगराध्यक्षाचा समावेश आहे. सातही जणांनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष किंवा नगरसेवकपद भूषवलं आहे.

नितेश राणे यांची प्रतिक्रिया

संबंधित बातम्या :

‘नितेश राणे यांच्या वागण्याला कंटाळून नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश’, शिवसेनेची खोचक टीका

(Rajan Teli reacts on Nitesh Rane supporter Corporators joining Shivsena)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.