Rajasthan Crisis | काँग्रेस आमदारांना आमिष देण्याबाबत कथित ऑडिओ क्लिप, केंद्रीय मंत्र्यावर गुन्हा
कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी भाजप नेते आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयपूर : राजस्थानमधील राजकीय नाट्य रंगतदार होत असताना एका कथित ऑडिओ क्लिपमुळे खळबळ उडाली आहे. जयपूरमधील भाजप नेते संजय जैन यांच्यामार्फत काँग्रेस आमदार भवरलाल शर्मा यांच्या संपर्कात राहून सरकार उलथण्यासाठी काँग्रेस आमदारांना लाच देण्याचा दावा या कथित क्लिपमध्ये करण्यात आला आहे. या प्रकरणी भाजप नेते आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Rajasthan Political Crisis FIR against BJP Union Minister Gajendra Singh Shekhawat in alleged Audio Clip)
कथित ऑडिओ क्लिपची दखल घेत काँग्रेसने तात्काळ आमदार विश्वेंद्र सिंह आणि भवरलाल शर्मा यांचं पक्षातील प्राथमिक सदस्यत्व रद्द केलं. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
“गुरुवारी एक धक्कादायक ऑडिओ क्लिप प्रसारमाध्यमांमधून समोर आली. यामध्ये केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, भाजप नेते संजय जैन आणि काँग्रेस आमदार भवरलाल शर्मा राजस्थान सरकार पाडण्यासाठी आमदारांना लाच देण्याविषयी बोलत आहेत” असं सुरजेवाला म्हणाले.
Yesterday, shocking tapes were aired by the media in which Union Minister Gajendra Singh Shekhawat, BJP leader Sanjay Jain & Congress MLA Bhanwar Lal Sharma spoke about bribing MLAs and bringing down Rajasthan govt: Randeep Singh Surjewala, Congress pic.twitter.com/xYHUVSgTTl
— ANI (@ANI) July 17, 2020
“राजस्थान सरकार आणि स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप (एसओजी) यांच्याकडे एफआयआर नोंदवून दोषींना अटक करावी, अशी आमची मागणी आहे. कारण आता पुष्कळ पुरावे समोर आले आहेत.” असं सुरजेवाला यांनी सांगितलं.
#WATCH The tapes that have surfaced between yesterday evening & today morning show that BJP has, prima facie, conspired to topple Congress govt & buy MLAs’ loyalty. BJP dwara janmat ka apaharan aur prajatantra ke cheerharan ki koshish ki ja rahi hai: Randeep Surjewala, Congress pic.twitter.com/zguy8xQUIa
— ANI (@ANI) July 17, 2020
त्यानंतर मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजस्थानमधील सरकार पाडण्यासाठी काँग्रेसच्या आमदारांना पैशाचे आमिष दाखवल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. “मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. ऑडिओमध्ये माझा आवाज नाही” असा दावा शेखावत यांनी केला.
I am ready to face any investigation. The audio doesn’t have my voice: Union Minister, Gajendra Singh Shekhawat (file pic) https://t.co/lG4exVa14t pic.twitter.com/FFQUoHgzJL
— ANI (@ANI) July 17, 2020
काँग्रेस आमदार भवरलाल शर्मा आणि विश्वेंद्र सिंह यांचं प्राथमिक सदस्यत्व काँग्रेस पक्षाकडून रद्द करण्यात आलं आहे. पक्षाने त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे.
Congress issues statement on the suspension of MLAs Bhanwar Lal Sharma and Vishvendra Singh from the primary membership of the party. Show cause notices issued to them to “explain their conduct in the conspiracy to topple Congress govt in Rajasthan.” pic.twitter.com/oZ3YNcZqnX
— ANI (@ANI) July 17, 2020
आमदारांची यादी भाजपला देण्याच्या आरोपावर सचिन पायलट यांनी पुढे येऊन आपली भूमिका जाहीर करायला हवी, असेही सुरजेवाला म्हणाले.
दरम्यान, व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप बनावट आहे. मुख्यमंत्र्यांसह विशेष कर्तव्यावर असलेले अधिकारी लोकेश शर्मा आमदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण मुख्यमंत्री तणावात आहेत, असा दावा आमदार भवरलाल शर्मा यांनी कथित ऑडिओ क्लिपबाबत केला.
#WATCH:Audio that has gone viral is fake. Officer on Special duty to CM,Lokesh Sharma is trying to pressurise MLAs by getting fake audios made as CM is in despair: Congress MLA Bhanwar Lal Sharma on audio clips in which he is purportedly heard conspiring to topple #Rajasthan govt pic.twitter.com/35JTpkzajl
— ANI (@ANI) July 16, 2020
संबंधित बातम्या :
सचिन पायलट हायकोर्टात, हरीश साळवे आणि मुकुल रोहतगी खिंड लढवणार
फाडफाड इंग्रजी आणि हँडसम दिसणे पुरेसे नाही, गहलोतांचा पायलटांना टोला
(Rajasthan Political Crisis FIR against BJP Union Minister Gajendra Singh Shekhawat in alleged Audio Clip)