Rajasthan Live | मी भाजपमध्ये जाणार नाही, सचिन पायलट यांची मोठी घोषणा

काँग्रेसच्या कारवाईवर आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त करताना "सत्याला व्यथित केले जाऊ शकते, मात्र पराजीत नाही" असे सूचक विधान सचिन पायलट यांनी केले होते.

Rajasthan Live | मी भाजपमध्ये जाणार नाही, सचिन पायलट यांची मोठी घोषणा
Follow us
| Updated on: Jul 15, 2020 | 9:41 AM

जयपूर : राजस्थानातील राजकीय घडामोडी उत्कंठावर्धक वळणावर आहेत. मी भाजपमध्ये जाणार नाही, अशी मोठी घोषणा राजस्थानचे युवा नेते सचिन पायलट यांनी केली. काँग्रेसने राजस्थानच्या उपमुख्यमंत्रीपद आणि प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी केल्यानंतर सचिन पायलट पहिल्यांदाच माध्यमांसमोर आपली सविस्तर प्रतिक्रिया देणार आहेत. (Rajasthan Political Crisis Sachin Pilot Live Update)

सचिन पायलट यांनी भाजपमध्ये न जाण्याचा निर्णय घेतल्याने ते तिसरी आघाडी अर्थात नवीन पक्ष स्थापन करण्याच्या शक्यता बळावल्या आहेत.

काँग्रेसने उगारलेल्या कारवाईच्या बडग्यानंतर माजी मंत्री आणि पायलट गटाचे आमदार विश्वेंद्र यांनी हा तर 20-20 सामना असून कसोटी सामना बाकी असल्याचे म्हणत स्वपक्षाला आव्हान दिले होते. त्यामुळे पायलट काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

हेही वाचा : सचिन पायलट यांचे समर्थन भोवले, महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्याचे पक्षातून निलंबन

राज्यभरातून पाठिंबा मिळाल्यानंतर सचिन पायलट यांनी ट्विटमध्ये सर्वांचे आभार मानले होते. “आज माझ्या समर्थनार्थ बाहेर पडलेल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि आभार. राम, राम!” याआधी त्यांनी काँग्रेसच्या कारवाईवर आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. “सत्याला व्यथित केले जाऊ शकते, मात्र पराजीत नाही” असे सूचक विधान त्यांनी केले होते.

भाजपची बैठक

दुसरीकडे, भाजपने अद्याप आपले पत्ते उघड केलेले नाहीत. राजस्थानमधील भाजपच्या दिग्गज नेत्या आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे जयपूरमध्ये नव्हत्या. त्यांनी या संदर्भात अद्याप भाष्य केले नाही.

दिल्लीत भाजपच्या महत्त्वपूर्ण बैठकीला वसुंधरा राजे हजेरी लावण्याची शक्यता आहे. सचिन पायलट यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपदेखील उघडपणे खेळी करु शकते. केंद्रीय मंत्र्यांसह भाजपच्या अनेक नेत्यांनी सचिन पायलट भाजपमध्ये आल्यास त्यांचे स्वागत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पायलट ऑफर स्वीकारणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. परंतु आता पायलट यांनी भाजपमध्ये न जाण्याचा निर्णय घेत सर्वांना अवाक केले.

संबंधित बातम्या :

काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप, सचिन पायलट यांच्या समर्थनार्थ 300 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

अशोक गहलोत जास्त दिवस मुख्यमंत्री राहणार नाहीत, भाजपची प्रतिक्रिया

राजस्थानच्या उपमुख्यमंत्रिपदावरुन हकालपट्टी, सचिन पायलट यांची 9 शब्दात प्रतिक्रिया

(Rajasthan Political Crisis Sachin Pilot)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.