Rajasthan Politics | राजस्थानमध्ये राजकारण तापले, गेहलोत यांचा भाजपवर घोडेबाजाराचा आरोप, पायलट दिल्लीत

राजस्थानमधील काँग्रेसचे 22 आमदार शनिवारी हरियाणातील हॉटेलमध्ये पोहोचले आहेत. राज्यसभेच्या मतदानाचा दिवस म्हणजे 19 जूनपर्यंत आमदारांना हॉटेलमध्ये थांबण्यास सांगितले आहे.

Rajasthan Politics | राजस्थानमध्ये राजकारण तापले, गेहलोत यांचा भाजपवर घोडेबाजाराचा आरोप, पायलट दिल्लीत
Follow us
| Updated on: Jul 12, 2020 | 12:18 PM

जयपूर : मध्य प्रदेशनंतर राजस्थानमधील काँग्रेस सरकारही संकटात येण्याची भीती वर्तवली जात आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील संघर्ष वाढत असल्याचे बोलले जात आहे. एकीकडे काँग्रेस सरकार पाडण्यासाठी भाजप राजस्थानमध्ये घोडेबाजाराचा प्रयत्न करत असल्याचा आरोप गेहलोत यांनी केला आहे. तर सचिन पायलट दिल्ली दरबारी पोहोचल्याने चर्चांना ऊत आला आहे. (Rajasthan Politics takes turn Deputy CM Sachin Pilot visits Delhi)

अशोक गहलोत यांनी काल (शनिवारी) रात्री साडेआठ वाजता कॅबिनेट मंत्र्यांची बैठक बोलावली. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत राजस्थान सरकारचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट उपस्थित नव्हते. पायलट यांच्यासह काँग्रेसचे 10 आमदार दिल्लीत गेल्याने राजकीय संकट गडद झाल्याचं बोललं जात आहे.

राज्यसभा निवडणुकांच्या तोंडावर राजकीय संकट

राजस्थानमध्ये रिक्त असलेल्या राज्यसभेच्या तीन जागांसाठी काँग्रेसने केसी वेणुगोपाल आणि नीरज डांगी हे दोन उमेदवार उभे केले आहेत, तर भाजपनेही राजेंद्र गेहलोत आणि ओंकारसिंग लखावत हे दोन उमेदवार मैदानात उतरवले आहेत.

दरम्यान, राजस्थानमधील काँग्रेसचे 22 आमदार शनिवारी हरियाणातील हॉटेलमध्ये पोहोचले आहेत. राज्यसभेच्या मतदानाचा दिवस म्हणजे 19 जूनपर्यंत आमदारांना हॉटेलमध्ये थांबण्यास सांगितले आहे.

काँग्रेस नेते आपल्या नाराज आमदारांना परत येण्यास भाग पाडण्यासाठी हॉटेलमध्ये येऊ शकतात, असा पोलिसांना संशय आहे. काँग्रेस आमदारांची भेट घेण्यासाठी भाजपचे नेते रात्री उशिरा हॉटेलमध्ये येण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसचे बंडखोर आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे सांगितले जाते. त्यांच्या मदतीने राजस्थानमध्ये भाजप आपले सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. (Rajasthan Politics takes turn Deputy CM Sachin Pilot visits Delhi)

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.