AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पैसे देतो, पोलिसांनी संरक्षण द्यावं’ फडणवीसांचे आभार मानताना बार्शीच्या आमदार पुत्रानं नेमकं असं का म्हटलं?

बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांचा मुलगा रणवीरला फसवण्यात येत असल्याचा आरोप फडणवीसांनी केलाय. याबाबत आम्ही रणवीरची प्रतिक्रिया जाणून घेतली असता रणवीरने बार्शीतील विदारक स्थिती विधानसभेत मांडल्यावर फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

'पैसे देतो, पोलिसांनी संरक्षण द्यावं' फडणवीसांचे आभार मानताना बार्शीच्या आमदार पुत्रानं नेमकं असं का म्हटलं?
आमदार राजेंद्र राऊत यांचा मुलगा रणवीर राऊत आणि देवेंद्र फडणवीसImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 24, 2022 | 11:11 PM

बार्शी : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर जोरदार हल्ला चढवला. अवैध धंद्याविरोधात लोकप्रतिनिधी पुराव्यानिशी मुद्दे मांडत आहेत म्हणून त्यांना टार्गेट करण्यात येत असेल तर ही चुकीची गोष्ट असल्याचे सांगत पोलीस निरीक्षकाबाबत काही गोष्टी त्यांनी उपस्थित केल्या. तर अशा गोष्टी होत असतील तर तर बार्शीच्या त्या पीआय विरोधात मी स्वत: हजारोचा मोर्चा काढेन असा इशारा फडणवीस यांनी दिलाय. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांचा मुलगा रणवीरला फसवण्यात येत असल्याचा आरोप फडणवीसांनी केलाय. याबाबत आम्ही रणवीरची प्रतिक्रिया जाणून घेतली असता रणवीरने बार्शीतील विदारक स्थिती विधानसभेत मांडल्यावर फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

माजी मंत्री दिलीप सोपल यांचे समर्थक भाऊसाहेब आंधळकर यांनी फेसबुक लाईव्हद्वारे आपल्याला धमकावलं असल्याचा आरोप रणवीर राऊतने केलाय. फेसबुक लाईव्हद्वारे पुण्यातील गँगवॉर, मुंबईतील गँगवॉरमार्फत तुम्हाला संपवू अशा वारंवार धमक्या आंधळकर यांनी दिल्या. याचे सर्व पुरावे आम्ही पेनड्राईव्हद्वारे पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस निरीक्षक कार्यालय यांना वारंवार पत्र व्यवहार करतोय. जीवाला धोका असल्यानं वारंवार मी पैसे भरुन पोलीस संरक्षण देण्याची मागणी वर्षभरापासून करत आहे. मात्र, आपल्या मागणीचा गंभीरपणे विचार केला जात नसल्याचं रणवीर राऊतने सांगितलं.

तत्काळ पोलीस संरक्षण द्या, राऊतांच्या मुलाची मागणी

बार्शीतील माजी आमदार आणि माजी मंत्री दिलीप सोपल, शिवसेना नेते भाऊसाहे आंधळकर तसंच काही आरटीआय कार्यकर्ते बार्शीतील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबोरबर हे सर्वजण षडयंत्र रचून माझ्यावर हल्ला करून, मलाच 302 किंवा 307 सारख्या कलमांतर्गत गुंतवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मला तत्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावं अशी मागणीही रणवीरने केली आहे.

फडणवीसांचा ठाकरे सरकारला इशारा

आमदार राजेंद्र राऊत यांच्या मुलाला फसवण्याचाही प्रकार घडण्याची शक्यता आहे. या पोलीस निरीक्षकांबाबत मी स्वतः तक्रार करुनही त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. बार्शीच्या पोलीस निरीक्षकाबद्दल गृहमंत्र्यांनी एकदा आपल्या छातीवर हात ठेऊन खरं काय ते सांगावं. राज्यात सगळ्या चुकीच्या घटना घडत असून लोकप्रतिनिधींवर जर पोलिसांकडून दंडूकेशाही चालवली जात असेल तर ती चुकीची आहे, आणि त्यासाठी मी स्वतः तिथे जाऊन हजारोंच्या संख्येने मोर्चा काढेन असा इशाराच फडणवीसांनी दिलाय.

इतर बातम्या : 

Breaking : ‘शरीरात चुकीचं औषध टाकून मला संपवण्याचा डाव होता’, नितेश राणेंचा गंभीर आरोप; ‘कलानगर’चाही उल्लेख!

Devendra Fadnavis : फडणवीसांनी BMC तील सत्ताधारी शिवसेनेचा बुरखा टराटरा फाडला! फडणवीसांच्या भाषणातील 10 महत्वाचे मुद्दे एका क्लिकवर

'सरकार मोदी की सिस्टिम राहुल गांधीकी', संजय राऊतांचा खोचक टोला
'सरकार मोदी की सिस्टिम राहुल गांधीकी', संजय राऊतांचा खोचक टोला.
मुंबईच्या हुतात्मा चौकात राज ठाकरे आणि सुप्रिया सुळेंची आपुलकीची भेट
मुंबईच्या हुतात्मा चौकात राज ठाकरे आणि सुप्रिया सुळेंची आपुलकीची भेट.
'जिथे खड्डे खोदले तिथेच..', वक्फच्या अधिकाऱ्यांना जलील यांची धमकी
'जिथे खड्डे खोदले तिथेच..', वक्फच्या अधिकाऱ्यांना जलील यांची धमकी.
मी निवडून आलो असतो, तर शिंदे मुख्यमंत्री झाले असते - शहाजी बापू पाटील
मी निवडून आलो असतो, तर शिंदे मुख्यमंत्री झाले असते - शहाजी बापू पाटील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर.
प्रवाशांनी केलं असं काही.., वैतागलेल्या चालकाने बस चालवण्यास दिला नकार
प्रवाशांनी केलं असं काही.., वैतागलेल्या चालकाने बस चालवण्यास दिला नकार.
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.