राष्ट्रवादी निवडणुकीसाठी तयार? राजेश टोपे यांनी स्पष्टपणे सांगितलं…
राज्याचे माजी आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. यावेळी बोलताना आपल्यासारख्या लोकशाहीप्रधान राजकारणामध्ये निवडणुकीसाठी सदैव तयार असायला पाहिजे, असं राजेश टोपे म्हणाले आहेत.
नवी दिल्ली: राष्ट्रवादीचं आज आठवं अधिवेशन होतंय. राजधानी दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियमवर राष्ट्रवादीचं अधिवेशन (NCP Adhiveshan) होतंय. शरद पवार यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेते अधिवेशनाला उपस्थित असणार आहेत. राज्यातील आमदार खासदार अधिवेशनासाठी नवी दिल्लीत दाखल झालेत. थोड्याच वेळात अधिवेशन सुरू होईल. तत्पुर्वी राज्याचे माजी आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. यावेळी बोलताना आपल्यासारख्या लोकशाहीप्रधान राजकारणामध्ये निवडणुकीसाठी सदैव तयार असायला पाहिजे, असं राजेश टोपे म्हणाले आहेत. नवे संकल्प, नवी ऊर्जा घेऊन जाण्यासाठी आम्ही आलो आहोत. सध्याच्या राजकीय परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी नवा संकल्प करण्यासाठी आम्ही हे अधिवेशन बोलावलं आहे. त्यासाठी सर्वजण आले आहेत, असं टोपे म्हणाले.