Raju Shetty : मुख्यमंत्री किती दिवस जबाबदारी झटकणार? राजू शेट्टींचा सवाल; ऊस प्रश्नावर उद्धव ठाकरेंवर निशाणा

Raju Shetty on Uddhav Thackeray : तुम्ही बाळासाहेब थोरात आणि पवारांकडे जर हे विषय सोपवणार असाल तर कसे होणार? ते दोघेही कारखानदार आहेत ते सोयीप्रमाणे निर्णय घेतील, असा घणाघात राजू शेट्टी यांनी केलाय. ते आज सोलापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

Raju Shetty : मुख्यमंत्री किती दिवस जबाबदारी झटकणार? राजू शेट्टींचा सवाल; ऊस प्रश्नावर उद्धव ठाकरेंवर निशाणा
ऊस प्रश्नावरुन राजू शेट्टींची मुख्यमंत्र्यांवर टीकाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 04, 2022 | 4:34 PM

सोलापूर : राज्यात हंगाम संपत आला तरी अतिरिक्त उसाचा प्रश्न (Sugar Cane Issue) अद्याप सुटलेला नाही. राज्यात अनेक भागात अजूनही ऊस फडात उभा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट उभं राहिलं आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केलीय. ‘अडीच वर्षे झाले मुख्यमंत्री होऊन तुम्ही किती दिवस जबाबदारी झटकणार आहात. तुम्ही बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि पवारांकडे जर हे विषय सोपवणार असाल तर कसे होणार? ते दोघेही कारखानदार आहेत ते सोयीप्रमाणे निर्णय घेतील, असा घणाघात राजू शेट्टी यांनी केलाय. ते आज सोलापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

राजू शेट्टी म्हणाले की, बियाणे कंपन्यांनी किती उत्पादन केले आणि गरज किती आहे? रासायनिक खते आणि बी बियाणे याबाबत मुख्यमंत्र्यांनी काय आणि कसा आढावा घेतला हे माहिती नाही. शेतकऱ्यांची शेती करावी की नाही हे सांगावं. साखर परिषद थाटामाटात सुरु आहे पण शेतकरी कुठे दिसतो का? असा सवालही शेट्टी यांनी केलाय. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक केली, 20 हजाराची खंडणी घेतली. पण शेतकऱ्यांना काय दिलं? महाराष्ट्रातील एकूण कारखान्यांची गाळप क्षमता आणि प्रत्यक्ष ऊस याचे गणित केले असते तर 30 – 40 कारखाने सरकारनं ताब्यात घेऊन चालवायला दिले असते तर उसाचा प्रश्न जाणवला नसता, असं शेट्टी म्हणाले. तसंच अतिरिक्त ऊसाचे अपयश सरकार झटकू शकत नाही. पुणताब्यांच्या मागण्या या कृषी मंत्र्यांच्या लेव्हलवर संपण्यासारखं नव्हतं. मात्र, कृषीमंत्र्यांनी काय आश्वासनं दिली माहिती नाही. खत तुटवड्याला राज्य सरकार नव्हे तर केंद्र सरकार जबाबदार आहे, असंही शेट्टी यांनी म्हटलंय.

नीरा उजवा लाभक्षेत्रातील पाणी इंदापूर, बारामतीला नेणं किती योग्य?

राज्यसभेवर सुरु असलेला घोडेबाजार मी पाहतोय. राजकारण किती खालच्या स्तराला गेलं आहे हे मी पहिल्यांदा पाहतोय. विधान परिषदेसाठी मी इच्छूक नाही. लोकांना जर वाटत असेल की मी सभागृहात मी जावे तर त्यांनी वर्गणी काढून मला निवडून द्यावं. मंगळवेढ्यातील 35 गावच्या योजना, दहिगाव, सीना, माढा, अक्कलकोट, बार्शी यासह विविध योजना अर्धवट आहेत. या योजना पूर्ण झाल्या असत्या तर उजनीत थेंबभर पाणी राहिलं नसतं. पालकमंत्री भरणे यांनी नीरा उजवा लाभक्षेत्रातील पाणी इंदापूर, बारामतीला नेणं कितपत योग्य आहे. दुष्काळात होरपळणारा सोलापूर जिल्हा हिरवागार झाला असता. मागील दोन तीन दशके सोलापूर जिल्हा मागे उभा राहिला त्यांना पाणी न देणं हे दुर्दैवी असा टोला, शेट्टी यांनी पवारांवर लगावलाय.

हे सुद्धा वाचा

राजू शेट्टींचा शरद पवारांवर घणाघात

नितीन गडकरी यांनी साखर उद्योगाबाबत बोलले असावेत. गडकरींनी इथेनॉलबाबत ठोस भूमिका घेतली. साखर निर्यात झाली नसती तर फार मोठी अडचण आली असती. 20 टक्के साखर उत्पादन कमी झाले. मात्र इथेनॉलचे प्रमाण वाढले. शरद पवारांनी गडकरींचे कौतुक करावे. मात्र, पवारांनी लक्षात घ्यावे की ते 10 वर्षे कृषीमंत्री होते. मग त्यांना या गोष्टी का राबवता आल्या नाहीत याचं आत्मचिंतन त्यांनी करावं. नाबार्डमधून साखर उद्योगाला पतपुरवठा का केला नाही. कारण त्यामुळे साखर उद्योगाला 3 टक्क्यात कर्ज उपलब्ध झाले असते. मात्र, पवारांनी तसं केलं नाही. कारण त्यांना जिल्हा बँकेतील आपली बांगडुळे पोसायची होती, असा घणाघातही शेट्टी यांनी केलाय.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.