Rajya Sabha Election 2022 : जे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार अजित पवारांच्या दौऱ्यात सोबत होते, ते आता म्हणतात, मुख्यमंत्र्यांवर नाराजी !

देवेंद्र भुयार यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली. ते म्हणतात, ...म्हणून माझ्यासाठी दादा सांगतील ते तोरण आणि ठरवतील ते धोरण असते... यातून त्यांची अजित पवारांवरील श्रद्धा दिसून येते. पण, महाविकास आघाडीतील शिवसेनेवर मात्र त्यांची नाराजी आहे. अपक्ष आमदारांचं हे नाराजीनाट्य कायम. तेही राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर.

Rajya Sabha Election 2022 : जे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार अजित पवारांच्या दौऱ्यात सोबत होते, ते आता म्हणतात, मुख्यमंत्र्यांवर नाराजी !
अजित पवार, देवेंद्र भुयार, उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Jun 08, 2022 | 11:38 AM

अमरावती : अपक्ष आमदार (Independent MLA) देवेंद्र भुयार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज आहेत. मतदार संघातील विकास कामासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना 16 पत्र लिहिली. पण, या लिहिलेल्या एकाही पत्रात उत्तर मुख्यमंत्री यांनी दिलं नाही. त्यामुळं देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) नाराज असल्याची भुयारांनी कबुली दिली. मी मुख्यमंत्री यांच्यावर नाराज आहे. पण राज्यसभेला महाविकास आघाडीच्याच (Mahavikas Aghadi) उमेदवाराला मतदान करणार आहे. अशी माहिती आमदार देवेंद्र भुयार यांनी दिली. 16 पत्र देऊनही उत्तर मिळाले नसल्याची खंत भुयार यांनी व्यक्त केली. म्हणून माझ्यासाठी अजित दादा सांगतील ते तोरण आणि ठरवतील ते धोरण असते, अशी फेसबूक पोस्ट देवेंद्र भुयार यांनी टाकली.

मुख्यमंत्र्यांकडून पत्रांना उत्तर नाही

देवेंद्र भुयार हे वरुड-मोर्शी क्षेत्राचे आमदार आहेत. राजू शेट्टी यांच्या शेतकरी संघटनेतून ते निवडून आले. पण, मंत्रीपद न मिळ्यानं नाराज आहेत. त्यामुळं देवेंद्र भुयार हे अपक्ष आमदार असले, तरी राष्ट्रवादीशी त्यांची जवळीकता आहे. राष्ट्रवादीच्या कोणत्याही मोठ्या कार्यक्रमांना ते आवर्जून हजेरी लावतात. दोन आठवड्यापूर्वी जळगाव-जामोद येथे राष्ट्रवादीचा मेळावा झाला. या राष्ट्रवादीच्या मेळ्याव्यात देवेंद्र भुयार हे उपस्थित होते. देवेंद्र भुयार हे अजित पवारांच्या जवळचे आहेत. पण, त्यांची नाराजी ही शिवसेनेवर आहे. विकासकामासंदर्भात पत्र लिहिले. पण, उत्तर मिळाली नाही, असं त्यांचं म्हणण आहे. त्यातून देवेंद्र भुयार हे एकप्रकारे दबावतंत्राच वापर करताना दिसून येतात.

फेसबुकवरील पोस्ट

अजित दादा पवार म्हणतील तोच निर्णय आपण घेऊ आणि महाविकास आघाडीलाच मतदान करू. असं त्यांचं म्हणणंय. राज्यसभेसाठी दहा जूनला मतदान होणार आहे. त्यावेळी महाविकास आघाडीलाच मतदान करू, असं त्यांचं म्हणण आहे. यासंदर्भात देवेंद्र भुयार यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली. ते म्हणतात, …म्हणून माझ्यासाठी दादा सांगतील ते तोरण आणि ठरवतील ते धोरण असते… यातून त्यांची अजित पवारांवरील श्रद्धा दिसून येते. पण, महाविकास आघाडीतील शिवसेनेवर मात्र त्यांची नाराजी आहे. अपक्ष आमदारांचं हे नाराजीनाट्य कायम. तेही राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर.

हे सुद्धा वाचा

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.