Rajya Sabha Election 2022: इस ‘शोले’ के ठाकूर किसके संग? सत्तार म्हणतात, ठाकूर आमच्याकडेच !

Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा निवडणुकीचा रणसंग्राम सध्या महाराष्ट्राच्या विधान भवनात सुरु आहे. यात मातब्बर नेत्यांनी केलेल्या दाव्यांनी अफवांना उधाण आलंय. बहुजन विकास आघाडीच्या आमदारांच्या सस्पेन्समुळे तर भाजप आणि मविआ दोन्हीकडे चांगलीच अस्वस्थता आहे.

Rajya Sabha Election 2022: इस 'शोले' के ठाकूर किसके संग? सत्तार म्हणतात, ठाकूर आमच्याकडेच !
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 11:55 AM

मुंबईः राज्यसभा निवडणुकीच्या (Rajyasabha Election) रणसंग्रामाला सुरुवात झाली असून प्रत्येक मिनिटाला राजकीय पक्षांची धाकधुक वाढत आहे. कालपासून राजकीय गोटात अफवांचं पिक आलं असून नेत्यांकडून मोठ-मोठाले दावे केले जात आहे. कोणता आमदार कोणत्या पक्षाला मतदान करणार, दिलेलं वचन मोडणार की पक्षाशी एकनिष्ठ राहणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यातच बहुजन विकास आघाडीच्या (Bahujan Vikas Aghadi) तीन आमदारांनी आपलं मत अजूनही गुलदस्त्यात ठेवलं आहे. बविआचे नेते हितेंद्र ठाकूर हे मतदानासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मात्र अद्याप त्यांनी मतदानाबाबत स्पष्ट वक्तव्य केलेलं नाही. दुपारी दोन वाजता आमचं मत कुणाला आहे, हे कळणार असल्याचं हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांनी म्हटलंय. मात्र इकडे शिवसेना मंत्री अब्दुल सत्तार यांनी मात्र ठाकूरांबाबत छातीठोकपणे दावा केलाय. सगळे ठाकूर आमच्याच बाजूने मतदान करणार असल्याचं ते म्हणाले.

बहुजन विकास आघाडीचं सस्पेन्स

बहुजन विकास आघाडीचे विरारचे आमदार हितेंद्र ठाकूर, नालासोपाऱ्याचे क्षितीज ठाकूर, भोईसरचे आमदार राजेश पाटील या तीन आमदारांचं मत महाविकास आघाडीला जाणार की भाजपाला जाणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेच्या निवडणुकीसाठीची ही लढाई शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा वाढवणारी ठरत आहे. यातच बहुजन विकास आघाडीनं आपला सस्पेन्स कायम ठेवला आहे. सध्या हितेंद्र ठाकूर आणि इतर दोन आमदार आता मुंबईतील विधान भवनाच्या दिशेने रवाना झाले आहेत. दुपारी दोन वाजता ते मतदान करतील. तोपर्यंत भाजप आणि महाविकास आघाडी या दोन्ही गोटातील अस्वस्थता कायम राहणार असं दिसतंय.

‘ठाकूर आमच्याकडेच’

राज्यसभेच्या निवडणुकीसाठीचं गणित अत्यंत क्लीष्ट तेवढंच राजकीय दृष्ट्या रंजक असल्यानं एका-एका आमदाराचं मत तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे बहुजन विकास आघाडीच्या मतांकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. यातच महाविकास आघाडीतील मंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भाजपाच्या पोटात गोळा आला आहे. हितेंद्र ठाकूरांची सर्व मतं आमच्याच बाजूने आहेत, असा दावा त्यांनी केलाय. त्यामुळे मविआकडे ही मते जाणार की काय, अशा चर्चांना उधाण आलं आहे.

हे सुद्धा वाचा

‘दावनेंचे पुत्रही आमच्याकडेच’

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दावे आणि अफवांचं पेवच फुटलंय. अब्दुल सत्तारांनी आज सिक्सर मारत जालना जिल्ह्यातील भोकरदन विधानसभा मतदार संघाचे आमदार संतोष दानवेही आमच्याबाजूने मतदान करणार असल्याचा दावा केला. भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे ते पुत्र आहे. दानवेंनी ज्या विश्वासानं हा दावा केला, त्यावरून आणखीच चर्चा उठल्या आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.