Rajya Sabha Election : राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक जाहीर, 10 जूनला मतदान; जागांचं गणित कसं असणार?

राज्यसभेच्या 6 जागांपैकी पाच जागांवर भाजप आणि महाविकास आघाडीचे खासदार निवडून जातील. तर सहावी जागा रिक्त राहणार आहे. या जागेवर संभाजीराजे छत्रपती अपक्ष लढणार आहेत.

Rajya Sabha Election : राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक जाहीर, 10 जूनला मतदान; जागांचं गणित कसं असणार?
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक जाहीरImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 12, 2022 | 4:36 PM

मुंबई : महाराष्ट्रातील 6 राज्यसभा सदस्यांचा (RajyaSabha MP) कार्यकाळ संपुष्टात येत असल्यानं त्या जागांवरील निवडणूक आता जाहीर झाली आहे. यानिवडणुकीसाठी 31 मे पर्यंतही अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. तर 10 जून रोजी मतदान पार पडेल. राज्यसभेच्या 6 जागांपैकी पाच जागांवर भाजप आणि महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) खासदार निवडून जातील. तर सहावी जागा रिक्त राहणार आहे. या जागेवर संभाजीराजे छत्रपती (SambhajiRaje Chatrapati) अपक्ष लढणार आहेत. तशी घोषणाच त्यांनी आज केली आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर राजकीय पक्षांच्या संख्याबळात बदल झालाय. त्यामुळे राज्यसभेच्या जागांसाठी आता संख्येचं गणित बदलल्याचं पाहायला मिळत आहे.

यापूर्वीच्या संख्याबळानुसार तीन जागा भाजप, एक जागा राष्ट्रवादी कांग्रेस, एक जागा शिवसेना तर एका जागेवर काँग्रेस उमेदवार निवडून जात होता. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर या संख्याबळात बदल झाला आहे. आता भाजपच्या वाट्याला दोन जागा, तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या वाट्याला प्रत्येकी एक जागा जाईल. त्यामुळे सहावी जागा रिक्त राहणार आहे. या जागेवर संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. त्यावेळी त्यांनी मला सर्व राजकीय पक्ष मदत करतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

कोणत्या राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ संपतोय?

महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेलेल्या 6 सदस्यांचा कार्यकाळ संपतो आहे. त्यात शिवसेनेचे संजय राऊत, भाजपचे पियुष गोयल, डॉ विकास महात्मे आणि विनय सहस्त्रबुद्धे, काँग्रेसचे पी. चिदंबरम, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा
Rajyasabha MP

कोणत्या राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ संपणार?

संभाजीराजे छत्रपतींची अपक्ष लढण्याची घोषणा

खासदारकीची टर्म संपल्यानंतर आता संभाजीराजे यांची राजकीय वाटचाल काय असणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर छत्रपती संभाजीराजे यांनी महत्त्वाची आणि मोठी घोषणा केली. राज्यसभेची निवडणूक लढण्याचा निर्णय संभाजीराजे यांनी यावेळी जाहीर केला. त्यासोबत या निवडणुकीला अपक्ष सामोरे जाणार असल्याचे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले. अपक्ष म्हणून माझा कोणाला सन्मान करायचा असेल तर तो त्यांचा अधिकार असेल. मात्र सध्या तरी मी अपक्ष म्हणूनच लढणार असल्याचे ते म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही आभार मानले.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.