AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajya Sabha Election : छत्रपती संभाजीराजे म्हणतात, पत्रकार परिषदेत सत्यच बोललो, श्रीमंत शाहूंच्या विधानावर बोलण्यास नकार

एका सामान्य कार्यकर्त्याला शिवसेनेने संधी दिली त्याचा आम्हाला आनंद आहे. असे म्हणतानाच त्यांनी छत्रपती घराण्याचा कोणताही अपमान झाला नाही. मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवा असे म्हणता येणार नाही, असे म्हणत संभाजीराजे यांचे कानही टोचले.

Rajya Sabha Election : छत्रपती संभाजीराजे म्हणतात, पत्रकार परिषदेत सत्यच बोललो, श्रीमंत शाहूंच्या विधानावर बोलण्यास नकार
छत्रपती संभाजीराजे म्हणतात, पत्रकार परिषदेत सत्यच बोललो, श्रीमंत शाहूंच्या विधानावर बोलण्यास नकारImage Credit source: tv9
| Updated on: May 28, 2022 | 6:24 PM
Share

कोल्हापूर : शिवसेनेने (Shivsena) आपल्या निर्णयावर ठाम राहात संजय पवार यांना उमेदवारी दिल्याने संभाजी छत्रपती (Chatrapati Sambhajiraje) यांनी राज्यासभेच्या निवडणुकीतून माघार घ्यावी लागली आहे. संभाजीराजे यांचे वडील श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (shrimant Shahu chhatrapati) यांनी संजय यांना तिकीट मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. एका सामान्य कार्यकर्त्याला शिवसेनेने संधी दिली त्याचा आम्हाला आनंद आहे. असे म्हणतानाच त्यांनी छत्रपती घराण्याचा कोणताही अपमान झाला नाही. मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवा असे म्हणता येणार नाही, असे म्हणत संभाजीराजे यांचे कानही टोचले. त्यानंतर आता त्यावर संभाजीराजे यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. याबबत ट्विट करत संभाजीराजे म्हणतता, “छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरूण पत्रकार परिषदेत मी सत्य तेच बोललो आहे. माझ्या वडिलांचा मी आदरच करतो. ते जे बोलले त्यावर मी काही बोलू इच्छित नाही.” असे ट्विट संभाजीराजे यांनी केले आहे.

संभाजीराजे यांचं ट्विट

संजय राऊत घेणार भेट

संभाजीराजे यांचे वडील श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचे आशीर्वाद मी जाऊन घेणार आहे, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. तसेच श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या वक्तव्याचं कौतुकही केलं आहे. आम्ही राज्यसभेच्या निवडणूकीत राजकारण केले नाही. कोणीतरी संभाजीराजेंना पुढे करून माहाराष्ट्रात वेगळे वातावरण तयार करण्याचे प्रयत्न करत होते ते यावरून स्पष्ट झाले आहे. आजही कोल्हापुरच्या मातीत प्रामाणिकपणा जिवंत आहे. मी शाहू माहारांजाना भेटणरा आणि त्यांचे आशिर्वाद घेणार, असे राऊत म्हणाले आहेत.

भाजपने संभ्रम निर्माण केला

भाजपने जो राज्यात संभ्रम निर्माण केला होता, तो आता शाहु माहारांजानी दूर केला, मी त्यांचं वक्तव्य ऐकलं आहे.  काल फडणवीस यांनी म्हटले की शिवसेनेने संभाजी राजेंची कोंडी केली हे कीती खोटे होते ते यावरून आज स्पष्ट झाले आहे, असे म्हणत राऊतांनी भाजवरही हल्लाबोल चढवला आहे. तसेच श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांहीही राजेंना पुढे करून मतांचं विभाजन करणे ही फडणवीसांची खेळी असल्याचे म्हटले होते. यावर आता जोरदार राजकीय प्रतिक्रिया उमटत आहे. मात्र आता संभाजीराजेंच्या ट्विटने नवा संभ्रमही निर्माण झाला आहे.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.