AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 Full Winners List : 9 तासानंतर राज्यसभा निवडणुकीचा सस्पेन्स संपला! निकाल जाहीर, कुणाची कुणावर किती मतांनी मात?

Maharashtra Rajya Sabha Election Final Results 2022 LIVE : भाजपचे दोन तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार विजयी होणार यात कुठलीही शंका नव्हती. मात्र, भाजप आणि शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी उमेदवार देण्यात आल्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती.

Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 Full Winners List : 9 तासानंतर राज्यसभा निवडणुकीचा सस्पेन्स संपला! निकाल जाहीर, कुणाची कुणावर किती मतांनी मात?
पियुष गोयल, अनिल बोंडे, इम्रान प्रतापगढी, संजय राऊत, प्रफुल पटेलImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jun 11, 2022 | 6:51 AM
Share

मुंबई : राज्यसभा निवडणूक निकालाचा (Rajya Sabha Election Result) सस्पेन्स अखेर संपला आहे. मतदानानंतर तब्बल नऊ तासांनी निकाल हाती लागला. त्यात या निवडणुकीत भाजपचे तीन, तर शिवसेनेचा एक, राष्ट्रवादीचा एक तर काँग्रेसचा एक उमेदवार विजयी झालाय. त्यात पियुष गोयल, अनिल बोंडे, इम्रान प्रतापगढी, प्रफुल पटेल, संजय राऊत विजयी ठरले आहेत. राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामुळे यंदाच्या राज्यसभा निवडणुकीत अधिक रंगत पाहायला मिळाली. त्यातच शुक्रवारी मतदान पार पडलं. मात्र, संध्याकाळी 5 वाजता मतमोजणीला (Counting) सुरुवात होणार होती. मात्र महाविकास आघाडी आणि भाजपकडून एकमेकांच्या काही आमदारांच्या मतावर आक्षेप घेण्यात आल्यामुळे निकालाला मध्यरात्री उजाडली. मात्र, महत्वाची बाब म्हणजे भाजपनं घेतलेल्या आक्षेपानंतर शिवसेनेचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांचं मत बाद ठरवण्यात आलं. तर उर्वरित 284 मतं वैध ठरवण्यात आली.

राज्यसभा निवडणुकांचा निकाल अखेरीस लागला आहे. यात अपेक्षेप्रमाणे मविआचे तीन आणि भाजपाचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. शिवसेनेचे संजय राऊत यांना 41 मते मिळाली आहेत. राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांना पहिल्या पसंतीची 43 मते मिळाली आहेत. काँग्रेसच्या इम्रान प्रतापगढी यांना पहिल्या पसंतीची 44 मते मिळाली आहेत. भाजपाच्या पियुष गोयल यांना 48 तर अनिल बोंडे यांना 48 मते मिळाली आहेत. तर शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना पहिल्या पसंतीची 33 मते तर महाडिक यांना पहिल्या पसंतीची 26 मते मिळाली आहे.

पहिल्या पाच जागांचा निकाल अपेक्षेप्रमाणेच

भाजपचे दोन तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी उमेदवार विजयी होणार यात कुठलीही शंका नव्हती. मात्र, भाजप आणि शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी देण्यात आलेल्या उमेदवारापैकी कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. या निवडणुकीत भाजपकडून पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं होतं. तर काँग्रेसकडून इम्रान प्रतापगढी, राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल तर शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती.

सहाव्या जागेवर महाडिक विजयी, पवारांचा पराभव

सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. तर भाजपकडूनही कोल्हापूरच्याच धनंजय महाडिकांना उमेदवारी देण्यात आली होती. कोल्हापूरच्या आखाड्यात कोणता मल्ल बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. मात्र, राज्यसभा निवडणुकीच्या आखाड्यात भाजपनं यांनी बाजी मारली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला आणि पर्यायानं शिवसेनेला मोठा धक्का बसलाय.

कुणाचे किती उमेदवार विजयी?

  1. भाजप – 3
  2. शिवसेना – 1
  3. काँग्रेस – 1
  4. राष्ट्रवादी काँग्रेस – 1

पहिल्या पसंतीची कुणाला किती मते?

  1. प्रफुल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस- 43
  2. इम्रान प्रतापगढी, काँग्रेस – 44
  3. संजय राऊत, शिवसेना – 41
  4. पियुष गोयल, भाजप – 48
  5. अनिल बोंडे, भाजप – 48

सहाव्या जागेवर कोणत्या उमेदवाराची बाजी?

  1. धनंजय महाडिक, भाजप – 41
  2. संजय पवार, शिवसेना – 33

दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.