Rajya Sabha Election : शिवसेना आपल्या आमदारांना सुरक्षित स्थळी हलवणार; मुख्यमंत्र्यांनी सोमवारी ‘वर्षा’वर बोलावली बैठक

शिवसेनेच्या आमदारांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय. सोमवारी शिवसेना आमदारांसह अपक्ष आमदारांची मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर बैठक बोलावली आहे.

Rajya Sabha Election : शिवसेना आपल्या आमदारांना सुरक्षित स्थळी हलवणार; मुख्यमंत्र्यांनी सोमवारी 'वर्षा'वर बोलावली बैठक
Follow us
| Updated on: Jun 04, 2022 | 9:23 PM

मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Election) पार्श्वभूमीवर राज्यात जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून कोल्हापूरचे संजय पवार (Sanjay Pawar) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. तर भाजपनंही कोल्हापूरच्याच धनंजय महाडिकांना (Dhananjay Mahadik) मैदानात उतरवलंय. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार होणार असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येतोय. तसंच मतांची फाटाफूट टाळण्यासाठी शिवसेनेनं सावध भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. कारण शिवसेनेच्या आमदारांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय. सोमवारी शिवसेना आमदारांसह अपक्ष आमदारांची मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर बैठक बोलावली आहे. तिथून सर्व आमदारांना सुरक्षित स्थळी हलवणार असल्याची माहिती मिळतेय.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी 6 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षावर शिवसेनेसह अपक्ष आमदारांची बैठक बोलावली आहे. राज्यसभा निवडणुकीत मतांची फाटाफूट टाळण्यासाठी शिवसेना सावधगिरी बाळगत असल्याचं पाहायला मिळतंय. वर्षावर बैठक पार पडल्यानंतर तिथूनच सर्व आमदारांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय. राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपनंही उमेदवार दिल्यामुळे चुरस वाढली आहे.

महाविकास आघाडीवर छोट्या पक्षांची नाराजी

महाविकास आघाडीला सरकार स्थापनेवेळी समर्थन देणाऱ्या दोन छोट्या पक्षांनी उघड नाराजी व्यक्त केलीय. मी यांना सरकार स्थापनेला पाठिंबा दिला, आता हे मला वसई-विरार महापालिका सोडणार आहेत का? असा सवाल बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांनी केलाय. तर आपल्या विभागातील कामं झाली नाहीत, माझ्या पत्रांना तुम्ही उत्तरं देत नाही आणि हिंदुत्वाबाबत तुमची भूमिका साशंक आहे, अशी भूमिका समाजवादी पार्टीने घेतलीय. त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या अडचणी आता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

सहावी जागा मविआच जिंकणार, राऊतांचा दावा

‘राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजप इतर पक्षाच्या आमदारांवर कशाप्रकारे दबाव आणतेय, याची माहिती रोज येत आहे. ज्यांच्यावर दबाव आहे, ते आम्हाला सांगतायत. ईडी, केंद्राच्या अखत्यारीतून नवी प्रकरणं काढली जात आहेत. भाजपचं चरित्र पुन्हा उघडं होतंय. महाराष्ट्रात अशाप्रकारे निवडणूक लढवली जात असेल तर जनता पाहतेय. भाजपने हे पैसे एखाद्या सामाजिक कार्यात वापरावेत. बाकी गोष्टीसाठी मुख्यमंत्री समर्थ आहेत. मागील 50 वर्षांपासून आम्ही निवडणुका लढवत आहोत. याचा अनुभव सर्वाधिक आम्हाला जास्त आहे. फक्त ईडी, सीबीआय तुमच्या हातात असले तरी आमच्या हातात इतरही गोष्टी आहेत, असा इशाराच संजय राऊत यांनी भाजपला दिलाय.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.