Big News: पंकजा मुंडेंना संधी नाहीच? भाजपच्या विधान परिषदेच्या पाच उमेदवारांची नावं निश्चित, श्रीकांत भारतीयला लॉटरी

Pankaja Munde News : Vidhan Parishad Election Update : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकजा मुंडेना उमेदवारी दिली जाणार नसल्याचं दिसतंय.

Big News: पंकजा मुंडेंना संधी नाहीच? भाजपच्या विधान परिषदेच्या पाच उमेदवारांची नावं निश्चित, श्रीकांत भारतीयला लॉटरी
Follow us
| Updated on: Jun 08, 2022 | 11:51 AM

मुंबईः राज्यसभा आणि विधान परिषद (Vidhan Parishad Election) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला असून यातच एक मोठी बातमी हाती आली आहे. भाजपकडून विधान परिषद उमेदवारांची नावं निश्चित करण्यात आली आहेत. यात प्रवीण दरेकरांसह (Pravin Darekar) प्रसाद लाड, उमा खापरे,  श्रीकांत भारतीय, राम शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे . ही नावं जवळपास निश्चित झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.. लवकरच याबाबत अधिकृत घोषणाही केली जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे सदाभाऊ खोत आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पत्ता कट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मंगळवारी पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी दिली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार पंकजा मुंडेना उमेदवारी दिली जाणार नसल्याची माहिती समोर येतेय. यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय.

पंकजा मुंडेंचा पत्ता कट?

विधान परिषदेच्या 10 जागांसाठी येत्या 20 जून रोजी निवडणूक पार पडणार आहे. याकरिता उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत 9 जून ही आहे. भाजपाच्या चार जागांसाठी इच्छुकांमध्ये चढाओढ दिसून येत आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, कृपाशंकर सिंग, पंकजा मुंडे, राम शिंदे, सदाभाऊ खोत, श्रीकांत भारतीय आदींची नावं दिल्लीत पाठवण्यात आली होती. त्यापैकी प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, उमा खापरे, राम शिंदे आणि श्रीकांत या पाच उमेदावारांची नावं निश्चित झाल्याची माहिती हाती आली आहे. ओबीसी नेतृत्वासाठी पंकजा मुंडे किंवा राम शिंदे यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता होती. या दोघांच्या शर्यतीत पंकजा मुंडे यांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे. लवकरच भाजप तर्फे यासंबंधीची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

निवडणुकीचा कार्यक्रम काय?

– 09 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावे लागणार – 10 जूनला निवडणूक अर्जांची छाननी केली जाईलय – 13 जूनपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. – 20 जून रोजी मतदान पार पडेल. – सकाळी 9 ते दुपारी 4वाजेपर्यंत मतदान होईल. – 20जून रोजी सायंकाळी पाच नंतर मतमोजणी होईल. – 20 जून रोजीच विधान परिषदेचं चित्र स्पष्ट होईल.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.