राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी भाजपची मोर्चेबांधणी, उमेदवार ठरला, खासदारांना व्हीप

भाजपने राज्यसभेवरील आपल्या सर्व खासदारांना 14 सप्टेंबर रोजी सभागृहात हजर राहण्याचे आदेश देण्यासाठी व्हीप जारी केला.

राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी भाजपची मोर्चेबांधणी, उमेदवार ठरला, खासदारांना व्हीप
Follow us
| Updated on: Sep 09, 2020 | 3:57 PM

नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन येत्या 14 सप्टेंबरपासून सुरु होत आहे. पहिल्याच दिवशी राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी निवडणूक होणार असल्याने भारतीय जनता पक्षाने सर्व सदस्यांना उपस्थित राहण्यासाठी व्हीप बजावला आहे. (Rajyasabha Deputy Chairman Election in Rainy Session)

भाजपने राज्यसभेवरील आपल्या सर्व खासदारांना 14 सप्टेंबर रोजी सभागृहात हजर राहण्याचे आदेश देण्यासाठी तीन ओळींचा व्हीप जारी केला. विरोधी पक्षांनी एकत्रितपणे उमेदवार देण्याचा चंग बांधला असला, तरी निवडणुकीत भाजपचे पारडे जड मानले जात आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन 14 सप्टेंबरपासून एक ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.

राज्यसभेचे उपसभापती म्हणून हरीवंश यांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपल्यामुळे ही निवडणूक होत आहे. सत्ताधारी भाजप-एनडीएकडून पुन्हा जनता दल (युनायटेड) चे खासदार हरीवंश यांनाच उमेदवारी देण्यात आली. त्यांनी आजच (बुधवार 9 सप्टेंबर) आपला उमेदवारी अर्जही दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 11 सप्टेंबरपर्यंत मुदत आहे.

गेल्या निवडणुकीत हरीवंश यांनी काँग्रेस उमेदवार बी. के. हरीप्रसाद यांचा 125-105 अशा फरकाने पराभव केला होता. राज्यसभेत एनडीए समर्थक पक्षांचे संख्याबळ अधिक असल्यामुळे पुन्हा भाजपच बाजी मारण्याची शक्यता आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत उपसभापती पदाची निवडणूक लढण्याचा निर्णय झाला होता. विरोधी पक्षांकडून उपसभापती पदासाठी द्रमुकचा उमेदवार रिंगणात उतरवला जाण्याची शक्यता आहे.

कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत असून रुग्णसंख्येत भारत जगात दुसर्‍या क्रमांकावर आहे, याशिवाय लॉकडाऊनच्या गंभीर परिणामांसह कोरोनाची परिस्थिती हाताळण्याचा मुद्दाही अधिवेशनात उपस्थित करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. याशिवाय, सीमेवर चिनी आक्रमकता आणि तेथील सद्यस्थिती यावरही दोन्ही सभागृहांमध्ये काँग्रेस पक्ष चर्चा करणार आहे.

संबंधित बातम्या :

विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी पुन्हा शिवसेनेचा बुलंद आवाज, डॉ. नीलम गोऱ्हे यांची फेरनिवड

(Rajyasabha Deputy Chairman Election in Rainy Session)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.