Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajyasabha Election : भाजपकडून राज्यसभेसाठी तिसरा उमेदवार जाहीर, धनंजय महाडिक मैदानात, कोल्हापूर विरुद्ध कोल्हापूर सामना रंगणार

छत्रपती संभाजीराजे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने भाजप या निवडणुकीत आणखी एक उमेदवार उतरवला आहे. भाजपने कोल्हापूर विरुद्ध कोल्हापूर असा सामना आता रंगवला आहे. कोल्हापुरातले भाजप नेते आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांना भाजपने राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे.

Rajyasabha Election : भाजपकडून राज्यसभेसाठी तिसरा उमेदवार जाहीर, धनंजय महाडिक मैदानात, कोल्हापूर विरुद्ध कोल्हापूर सामना रंगणार
भाजपकडून राज्यसभेसाठी तिसरा उमेदवार जाहीर, धनंजय महाडिक मैदानातImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 29, 2022 | 10:16 PM

मुंबई : उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना राज्यसभेच्या निवडणुकीची चुरस (Rajyasabha Election) वाढत चालली आहे. आतापर्यंत तीन राजकीय पक्षांकडून पाच उमेदवरांची घोषणा करण्यात आली होती. तर एक जागा काँग्रेसच्या वाट्याला आहे. त्यामुळे आत्ताची स्थिती पाहता राज्यसभेचा कोटा पूर्ण होताना दिसत होता. मात्र भाजप (BJP) या निवडणुकीत आणखी रंगत आणत आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने भाजप या निवडणुकीत आणखी एक उमेदवार उतरवला आहे. भाजपने कोल्हापूर विरुद्ध कोल्हापूर असा सामना आता रंगवला आहे. कोल्हापुरातले भाजप नेते आणि माजी खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahdik) यांना भाजपने राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे.  त्यामुळे आता ही निवडणूक आणकी रंगतदार झाली आहे. कोल्हापूर विरुद्ध कोल्हापूर सामन्यात आता कोण बाजी मारणार? हे लवकरच कळेल.

कोण आहेत धनंजय महाडिक?

  1. 2004 मध्ये महाडिक यांनी कोल्हापुरातून राष्ट्रवादीचे सदाशिवराव मंडलिक यांच्या विरोधात शिवसेनेचे उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला होता.
  2. त्यानंतर त्यांनी शिवसेनेतून फारकत घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. परंतु 2009 च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने त्यांना पक्षाची उमेदवारी दिली नाही. त्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती.
  3. 2014 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीचे खासदार म्हणून त्यांनी लोकसभेत प्रवेश केला.
  4. 10 जानेवारी 2017 रोजी महाडिक, राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ, राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता संभाजीराव माने, कोल्हापूरच्या महापौर हसिना फरास आणि इतर 400 जणांना पुणे-बेंगळुरू मार्गावरील वाहतूक रोखल्याप्रकरणी अटक करण्यात आली.
  5. 2017, 2018 मध्ये त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना संसद रत्न पुरस्कारही मिळाला आहे.
  6. लोकसभेत कोल्हापूरचे प्रतिनिधीत्व केल्यानंतरत्यांनी 2019 च्या निवडणुकीत त्याच जागेवरून भाजपकडून निवडणूक लढवली. मात्र 2019 ची लोकसभा निवडणुकीत शिवसेना नेते संजय मंडलिक यांच्या विरोधात त्यांचा पराभव झाला.

सहावी जागा कुणाची होणार?

सहाव्या जागेसाठी सुरूवातीपासूनच शिवसेना जोर लावताना दिसत आहे. गेल्या निवडणुकीवेळीच सहाव्या जागेबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादीच वाटाघाटी झाल्या होत्या. त्यामुळेच राजे शिवसेनेकडून लढले नाहीत तरी शिवसेनेने संजय पवार यांना मैदानात उतरवलं. सहावी जागा शिवसेनेच्या गोटात यावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी अपक्ष आमदारांची बैठकही काही दिवसांपूर्वीच घेतली आहे. त्यामुळे भाजपला ही जागा जिंकणे किती शक्य आहे. याबबातही साशंकता आहे. मात्र सध्या तरी ही निवडणूक धनंजय महाडिक यांच्या एन्ट्रीने आणकी चुरशीची झाली आहे, एवढं मात्र नक्की.

लक्षवेधीवरून सभागृहात विरोधकांचा गदारोळ
लक्षवेधीवरून सभागृहात विरोधकांचा गदारोळ.
'समृद्धी'वर 1 एप्रिलपासून टोल वाढ, तुमच्या वाहनाला किती लागणार शुल्क?
'समृद्धी'वर 1 एप्रिलपासून टोल वाढ, तुमच्या वाहनाला किती लागणार शुल्क?.
क्षुल्लक कारणावरून उपसरपंचाला संपवलं; जळगाव हादरलं
क्षुल्लक कारणावरून उपसरपंचाला संपवलं; जळगाव हादरलं.
बिग बॉसचा सीझन आठवला, रोहिणी खडसेंच्या टीकेवर चित्रा वाघ यांचा पलटवार
बिग बॉसचा सीझन आठवला, रोहिणी खडसेंच्या टीकेवर चित्रा वाघ यांचा पलटवार.
औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेवरून अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा
औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेवरून अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा.
'...हा सरकारचा खोटानाटा खेळ', सुप्रिया सुळेंचा घणाघात
'...हा सरकारचा खोटानाटा खेळ', सुप्रिया सुळेंचा घणाघात.
सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीतच.. अहवालात नेमकं काय?
सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीतच.. अहवालात नेमकं काय?.
6 महिने..., मुंडेंच्या आमदारकीच्या राजीनाम्यावरून करूणा शर्मांचा दावा
6 महिने..., मुंडेंच्या आमदारकीच्या राजीनाम्यावरून करूणा शर्मांचा दावा.
भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी - संजय राऊत
भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी - संजय राऊत.
करूणा शर्मा म्हणाल्या ,'15 लाखांची मागणी, मात्र मुंडे 2 लाख पोटगीपण..'
करूणा शर्मा म्हणाल्या ,'15 लाखांची मागणी, मात्र मुंडे 2 लाख पोटगीपण..'.