आता आखाडा कोल्हापुरात! बंटी पाटलांच्या अनुषंगानं विचारलेल्या प्रश्नावर, धनंजय महाडिक म्हणतात, “बॅड पॅच संपला!” !
Rajyasabha Election Results 2022 : सतेज पाटील यांच्याविषयी धनंजय महाडिकांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा "बॅड पॅच संपला!", अशी प्रतिक्रिया धनंजय महाडिकांनी म्हटलंय.
मुंबई : मागच्या पाच वर्षापासून ज्या विजयाने धनंजय महाडिकांना (Dhananjay Mahadik) हुलाकावणी दिली. तोच धनं’जय’ महाडिकांनी परत मिळवला आहे. या विजयानंतर धनंजय महाडिक प्रचंड आनंदी दिसत आहेत. या विजयाची खात्री असल्यानेच देवेंद्र फडणविसांनी आपल्याला उमेदवारी दिल्याचं त्यांनी म्हटलं. शिवाय त्यांना त्यांचे राजकीय विरोधक सतेज पाटील (Satej Patil) यांच्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा “बॅड पॅच संपला!”, अशी प्रतिक्रिया धनंजय महाडिकांनी दिली.
महाडिक काय म्हणाले?
धनंजय महाडिकांना जेव्हा सतेज पाटील यांच्याविषयी प्रश्न विचारण्यात आला तेव्हा धनंजय महाडिक म्हणाले, “ही वस्तूस्थिती आहे की मागच्या काही वर्षांपासून आमच्या घराला यश मिळत नव्हतं. वारंवार पराभवाला सामोरं जावं लागत होतं. पण सध्या भाजपच्या पाठिंब्यामुळे आम्ही हा विजय मिळवू शकलो. आता महाडिक कुटुंबाचा बॅड पॅच संपला आहे. सहावी जागा म्हणजे रिस्क होती. ती रिस्क भाजपने घेतली. आणि महाडिक कुटुंबातील एकाला ही संधी दिली, या संधीचं आम्ही भविष्यत नक्कीच सोनं करू. भाजपचा पश्चिम महाराष्ट्रात विस्तार करण्यासाठी मी कटिबद्ध राहील.”
पराभवाची मालिका
मागच्या काही वर्षात महाडिक कुटुंबाला सतत पराभवाला सामोरं जावं लागत होतं. कोल्हापुरात प्रतिष्टेची असणाऱ्या गोकुळ निवडणुकीतही महाडिकांचा पराभव झाला आणि त्यांच्या या पराभवाला कारणीभूत होतं सतेज उर्फ बंटी पाटील यांचं कोल्हापुरातील राजकारणात वाढत चाललेलं वर्चस्व. एकीकडे बंटी पाटलांना लोकांचा वाढत चालेला पाठिंबा अन् महाडिक कुटुंबाच्या पदरी पडणारं अपयश कोल्हापूरसह राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला.
लोकसभेला धनंजय महाडिक पराभूत झाले. तर विधानसभा निवडणुकीत अमल महाडिकांना पराभव स्विकारावा लागला. तसंच ज्या गोकुळवर महाडिक कुटुंबाचा गेली 25 सत्ता होती. तिथेच सतेज पाटलांनी महाडिकांना पराभवाची धूळ चारली. सतेज पाटलांचं जिल्ह्यात वर्चस्व वाढत होतं. तर महाडिक मात्र वारंवार पराभूत होत होते. पण आता पराभवाच्या फटाक्यांची लागलेली माळ आता विझली असं म्हणता येईल कारण धनंजय महाडिकांचा राज्यसभा निवडणुकीत दणदणीत विजय झाला आहे.