Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajyasabha Election : महाविकास आघाडीला दुसरा मोठा झटका, हितेंद्र ठाकूर यांच्यापाठोपाठ सपाही मतदान करणार नाही

आता महाविकास आघाडीच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. कारण आता सपानेही महाविकास आघाडीला मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपचा मार्ग सध्या सुकर होताना दिसून येत आहे. मात्र खरं चित्र हे मतदानानंतरच स्पष्ट होईल.

Rajyasabha Election : महाविकास आघाडीला दुसरा मोठा झटका, हितेंद्र ठाकूर यांच्यापाठोपाठ सपाही मतदान करणार नाही
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 04, 2022 | 4:40 PM

मुंबई : राज्यसभेचे मतदान (Rajyasabha Election) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असताना महाविकास आघाडीला दणाक्यापाठोपाठ दणके बसत आहेत. कारण आधी बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांनी मतदानाबाबत सावध भूमिका घेतली. आणि आमची भूमिका ही मतदानादिवशीच ठरवू असे सांगतले. त्यानंतर आता महाविकास आघाडीच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. कारण आता सपानेही (Abu Azmi) महाविकास आघाडीला मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपचा मार्ग सध्या सुकर होताना दिसून येत आहे. मात्र खरं चित्र हे मतदानानंतरच स्पष्ट होईल. मात्र सध्या तरी या निवडणुकासाठी घोडेबाजार सुरू होताना दिसत आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी सध्या सात उमेदावर रिंगणार आहेत. त्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडीत सहाव्या जागेसाठी चुरस वाढली आहे.

सपाच्या मत्रातला मजकूर जसाच्या तसा

महोदय,

आज महाराष्ट्रात महाविकास आघाडीने सरकार स्थापन करून अडीच वर्षे पूर्ण केली आहेत. जातीयवादी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि इतर धर्मनिरपेक्ष पक्षांनी महाविकास आघाडीच्या समान किमान कार्यक्रमांतर्गत सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन धर्मनिरपेक्षतेच्या अटीवर शिवसेनेला पाठिंबा दिला.

हे सुद्धा वाचा

महोदय, गेली अडीच वर्षे मी आणि आमच्या पक्षाचे भिवंडी येथील आमदार रईस शेख यांनी अल्पसंख्याकांचे प्रश्न महाविकास आघाडी सरकारपर्यंत पत्रांद्वारे आणि शक्य तितक्या व्यासपीठावरून पोहोचवले आहेत, मुस्लिमांना 5% आरक्षण, हज समितीची नियुक्ती सीईओ आणि त्याची निर्मिती, मौलाना आझाद फायनान्स कॉर्पोरेशनची स्थापना, वक्फ बोर्डाची स्थापना, उर्दू अकादमी, अल्पसंख्याक विभागाचा विकास, अल्पसंख्याक बहुल भागातून यंत्रमाग यांसारखे अल्पसंख्याक समाजाचे व्यवसाय, प्रदुषणामुळे लोकांचे जीवनमान कमी करणारी वामकुक्षी कंपनी हटवणे, अर्थसंकल्पात अल्पसंख्याक समाजासाठी आणि धार्मिक स्थळांसाठी अधिक बजेट मिळण्याची तरतूद, अशा विविध मागण्या प्रलंबित आहेत. परंतु अडीच वर्षे पूर्ण होऊनही महाविकास आघाडी सरकारने कोणताही तोडगा काढला नाही.

तुम्ही माझ्या अनेक मागण्या आणि पत्रांना उत्तरे दिली नाहीत, तसेच यावेळीही करणार आहात? महाविकास आघाडी सरकार धर्मनिरपेक्ष आहे की ज्या नव्या हिंदुत्वाबद्दल तुम्ही आजकाल वारंवार बोलत आहात त्या आघाडीचा चेहरा आहे? महाराष्ट्र सरकारने अडीच वर्षात या प्रश्नांवर कोणतेही काम केले नाही, याचे स्पष्टीकरण जनतेला देण्याची जबाबदारी महाविकास आघाडी सरकारची आहे, अशा आशयाचे पत्र त्यांनी लिहिल्याने मुख्यमंत्री या पत्राला काय उत्तर देणार? आणि यांची नाराजी दूर होणार की राज्यसभा निवडणुकीवर याच मोठा परिणाम होणार? हे येत्या काही दिवसांत कळेलच.

सपाचे मुख्यमंत्र्यांना पत्र

ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन, देशभरात शोककळा
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन, देशभरात शोककळा.
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.