शरद पवारांच्या वक्तव्यामधून अहिल्याबाईंचा अपमान आणि नातवाविषयी प्रेम, राम शिंदेंचा ह्ल्लाबोल

शरद पवारांच्या वक्तव्यामधून अहिल्याबाईंचा अपमान झालाय, अशी टीका माजी मंत्री भाजप नेते राम शिंदे यांनी केली आहे. | Ram Shinde

शरद पवारांच्या वक्तव्यामधून अहिल्याबाईंचा अपमान आणि नातवाविषयी प्रेम, राम शिंदेंचा ह्ल्लाबोल
राम शिंदे, शरद पवार आणि रोहित पवार
Follow us
| Updated on: Feb 15, 2021 | 1:08 PM

अहमदनगर : जेजुरीतील अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या एका वक्तव्यावरुन भाजप नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. “नातवाच्या प्रेमापोटी त्यांनी हे वक्तव्य केलंय. ज्या वक्तव्याने अहिल्यादेवींचा अपमान झालाय. पवारांची ही गंभीर चूक आहे”, अशी टीका राम शिंदे यांनी केली आहे. (Ram Shinde criticized Sharad pawar over Alihyadevi holkar)

शरद पवार यांचं नेमकं वक्तव्य काय?

“अहमदनगर जिल्ह्यातून जामखेड तालुक्यातून जिथून राष्ट्रवादीचे रोहित पवार आमदार म्हणून विधानसभेवर जातात ज्या मतदारसंघातल्या चौंडीला अहिल्याबाई होळकर यांचा जन्म झाला”, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. अहिल्याबाईंच्या जन्माचं ठिकाण सांगण्याकरिता त्यांनी रोहित पवारांचं आणि त्यांच्या मतदारसंघाचं नाव घेण्याची खरंच गरज होती का? असा सवाल विचारत त्यांच्या याच वक्तव्यावर धनगर समाजातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पवारांच्या विधानानंतर राम शिंदे आक्रमक

अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी शरद पवारांनी जे नातवाच्या प्रेमापोटी वक्तव्य केलं त्या वक्तव्याने अहिल्यादेवींचा अपमान झालाय. पवारांची ही गंभीर चूक आहे. त्यांच्या बोलण्यातून अहिल्यादेवीपेक्षा नातवाचा मतदारसंघ श्रेष्ठ आणि त्यांच्या मतदारसंघात अहिल्यादेवीचा जन्म झाला आहे, असं सूच्त करणारं पवारांचं वक्तव्य होतं. जे अतिशय गंभीर होतं. पवारांची ही गंभीर चूक आहे.

मला वाटत शरद पवार हे राजकारणात आणि लोकशाहीतल अर्धशतक पूर्ण करणारे ज्येष्ठ नेते आहे. त्यांच्या तोंडून हे वाक्य गेलेलं आहे. ते अनावधानाने गेलं असेल किंवा स्लिप ऑफ टर्न झाले असेल मात्र असे वक्तव्य करणे ही गंभीर बाब असून अवमान आहे, असं राम शिंदे म्हणाले.

अहिल्याबाईंच्या पुर्णाकृती पुतळ्याचं पवारांच्या हस्ते अनावरण

शरद पवार यांच्या हस्ते शनिवारी जेजुरीमध्ये अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. या अनावरणाला सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात अहिल्यादेवी होळकर यांच्या कामाचा लेखाजोखाच शरद पवार यांनी मांडला. अहिल्याबाई होळकर या जागतिक ओळख असणाऱ्या स्त्रीयांपैकी एक होत्या. त्यांची तुलना रशियाची आणि ब्रिटनची राणी यांच्याशी करण्यात आल्याचं शरद पवार यांनी यावेळी आवर्जून सांगितलं. तसेच पेशव्यांनी इंग्रजांशी जवळीक वाढवल्यानंतर अहिल्यादेवींनी पेशव्यांनाही खडसावल्याची आठवण पवारांनी करुन दिली.

(Ram Shinde criticized Sharad pawar over Alihyadevi holkar)

हे ही वाचा :

कर्तृत्वाचा मक्ता फक्त पुरुषांकडे नाही, म्हणून महाराष्ट्रात 50 टक्के महिला आरक्षण : शरद पवार

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.