मग मी मंत्रालयात कसा येऊ? रामदास आठवलेंचा राज्य सरकारला सवाल!

राज्य सरकारनं आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयात ड्रेसकोड लागू केला आहे. त्यावरुन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्य सरकारला एक मिश्किल प्रश्न विचारलाय.

मग मी मंत्रालयात कसा येऊ? रामदास आठवलेंचा राज्य सरकारला सवाल!
Follow us
| Updated on: Dec 14, 2020 | 1:57 PM

मुंबई: राज्य सरकारनं आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयात ड्रेसकोड लागू केला आहे. सरकारी कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावे याबाबत सरकारनं काही निर्देश आखून दिले आहेत. त्यावरुन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्य सरकारला एक मिश्किल प्रश्न केलाय. मग मी मंत्रालयात कसा येऊ? असं रामदास आठवले यांनी विचारलं आहे. (Ramdas Athavale on state government dress code)

राज्यसरकार ने मंत्रालयात येणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी ड्रेसकोडचा नियम केला आहे. रंगबिरंगी नक्षीकामवाल्या कापड्यांच्या पोशाखास मनाई केली आहे. ही मनाई मंत्र्यांनाही लागू झाल्यास मला कसे मंत्रालयात येता येईल?, असं ट्वीट रामदास आठवले यांनी केलं आहे.

दरम्यान, सरकारनं दिलेले निर्देश हे केवळ सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आहेत. त्यामुळे मंत्री किंवा नेतेमंडळींचा संबंध नाही. पण रामदास आठवले यांनी आपला एक रंगीबेरंगी कपड्यातला फोटो ट्वीट करुन राज्य सरकारच्या या निर्णयावर मिश्किलपणे टीका केली आहे.

रामदास आठवलेंना ट्विटरवरुन सल्ले!

रामदास आठवले यांनी ट्वीट करुन राज्य सरकारला प्रश्न विचारल्यानंतर त्यांना सोशल मीडियावर अनेकांनी वेगवेगळे सल्ले दिले आहेत. त्यात राज्यपालांना भेटा, सरळ राजीनामा देऊन टाका, अशा सल्ल्यांचाही समावेश आहे. तर काहींनी त्यांना तुम्ही राज्यात नाही केंद्रात आहात, अशी आठवणही करुन दिली आहे.

सरकारचा ड्रेसकोड काय?

राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं काढलेल्या परिपत्रकानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना भडक रंगाचे, रंगीबेरंगी कपडे घालता येणार नाहीत. सरकारी कर्मचाऱ्यांना आता जीन्स, टी शर्टही घालता येणार नाही. महिला कर्मचाऱ्यांनाही ड्रेसकोड ठरवून देण्यात आला आहे. महिलांना कार्यालयात साडी, कुर्ता, सलवार, चुडीदार, दुपट्टा अशाच प्रकारचे कपडे घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे. त्याचबरोबर प्रत्येक शुक्रवारी सर्व कर्मचाऱ्यांनी खादीचे कपडे घालावेत असंही नव्या नियमांत सांगण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या:

Trupti Desai | साई मंदिराबाहेरील ड्रेसकोड सक्तीचा बोर्ड काढणारच : तृप्ती देसाई

Ramdas Athavale on state government dress code

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.