चीनला युद्ध हवे असल्यास भारत तयार, आठवले आक्रमक, चायनीज फूडवर बहिष्काराचे आवाहन

चिनी खाद्यपदार्थ व चिनी पदार्थांची हॉटेल्स भारतात बंद केली पाहिजेत!" अशी मागणी रामदास आठवले यांनी 'टीव्ही9 मराठी'शी बोलताना केली. (Ramdas Athawale appeals to boycott Chinese Food)

चीनला युद्ध हवे असल्यास भारत तयार, आठवले आक्रमक, चायनीज फूडवर बहिष्काराचे आवाहन
Follow us
| Updated on: Jun 18, 2020 | 12:54 PM

नवी दिल्ली : भारताला युद्ध नाही, बुद्ध पाहिजे. पण चीनला युद्ध हवे असल्यास भारत तयार आहे, असं म्हणत रिपाइं अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दंड थोपटले. चायनीज फूडवर बहिष्कार घातला पाहिजे, असे आवाहनही आठवले यांनी केले. (Ramdas Athawale appeals to boycott Chinese Food)

“चीन हा एक कपट करणारा देश आहे. भारताने सर्व चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला पाहिजे. चिनी खाद्यपदार्थ व चिनी पदार्थांची हॉटेल्स भारतात बंद केली पाहिजेत!” अशी मागणी रामदास आठवले यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना केली.

“भारताने चीनला बुद्ध दिला आहे, युद्ध दिलेले नाही. पण चीनला युद्धाची खुमखुमी असेल, तर भारतीय सैन्य चीनला कायमचा धडा शिकवतील. भारतात कोरोनाशी युद्ध सुरु आहे. त्यामुळे आता आम्हाला युद्ध नको बुद्ध हवा आहे. ‘कोरोना’शी सुरु असलेले युद्ध जिंकणार आहोत आणि वेळ आल्यास चीनशीही युद्ध जिंकू” असं आठवले म्हणाले.

हेही वाचा : Boycott Chinese Equipment : चीनला आर्थिक झटका देण्याची तयारी, BSNL चिनी उपकरणांचा वापर बंद करण्याची चिन्हं

(Ramdas Athawale appeals to boycott Chinese Food)

गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांशी झालेल्या संघर्षात शहीद जवानांना रामदास आठवले यांनी श्रद्धांजली अर्पण केली. “लडाखच्या गलवानमध्ये भारतीय सीमेवर चीनसोबत झालेल्या हिंसक संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले. वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना विनम्र श्रद्धांजली! जवानांचे हौतात्म्य व्यर्थ जाणार नाही. भारत सरकार आणि सर्व भारतीय शहीद जवानांच्या कुटुंबीयांसमवेत उभे आहेत!” अशा शब्दात आठवले यांनी आदरांजली व्यक्त केली.

काँग्रेसला सत्तेबाहेर पडण्याचा सल्ला

काँग्रेस पक्षाला विश्वासात घेऊन निर्णय घेतले जाऊ शकत नाहीत. त्यामुळे काँग्रेसने महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडावं, असा सल्ला रामदास आठवले यांनी दिला. (Ramdas Athawale appeals to boycott Chinese Food)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.