मेरा राजा बेटा… हेलिकॉप्टर प्रवासात रामदास आठवलेंकडून मुलाचे फोटोसेशन

इंदापूर ते मुंबई हेलिकॉप्टर प्रवासादरम्यान जीत आठवले यांना फोटोसेशनचा मोह आवरला नाही (Ramdas Athawale Son Jeet Athawale )

मेरा राजा बेटा... हेलिकॉप्टर प्रवासात रामदास आठवलेंकडून मुलाचे फोटोसेशन
रामदास आठवलेंनी मुलगा जीत यांचे फोटो काढले
Follow us
| Updated on: Apr 11, 2021 | 11:41 AM

मुंबई : आमदार-खासदार असो, वा मंत्री-मुख्यमंत्री… बाप हा बापच असतो. आपल्या लेकरांचं कौतुक कुठल्याही वडिलांच्या डोळ्यात चटकन दिसतं. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नजरेतही पुत्रप्रेम पाहायला मिळालं. हेलिकॉप्टर प्रवासात रामदास आठवलेंनी आवडीने लेकाचे फोटोसेशन केले. (Ramdas Athawale clicks photo of Son Jeet Athawale on Helicopter Ride Indapur Mumbai)

पंढरपूर मंगळवेढा प्रचारदौऱ्यात सहभाग

रामदास आठवले मुंबईहून इंदापूरला हेलिकॉप्टरला गेले. त्यानंतर पंढरपूर आणि मंगळवेढाला जाऊन पोटनिवडणुकीसाठी त्यांनी प्रचार केला. आठवलेंच्या प्रचार दौऱ्यात त्यांचे चिरंजीव जीत आठवलेही सहभागी झाले होते.

आधी वडिलांकडून फोटो, मग सेल्फी

मुंबईला परत येत असताना इंदापूर ते मुंबई हेलिकॉप्टर प्रवासादरम्यान जीत आठवले यांना फोटोसेशनचा मोह आवरला नाही. मग काय वडिलांच्या हाती जीत यांनी कॅमेरा सोपवला. रामदास आठवले यांनीही आपल्या लाडक्या लेकाचे आवडीने फोटो काढले. नंतर जीत यांनीही आपल्या वडिलांसोबत सेल्फी काढला. या अनमोल क्षणांना हेमंत रणपिसे आणि प्रवीण मोरे यांनी आपल्या डोळ्यांत साठवले.

जीत आठवले यांनी वडिलांसोबत काढलेला सेल्फी

रामदास आठवलेंचे कुकिंग

रामदास आठवले यांच्या शीघ्र चारोळ्या प्रसिद्ध आहेतच. मात्र त्या जोडीने त्यांना पाककलेची आवड असल्याचं काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. आठवलेंनीही ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत लॉकडाऊनच्या काळात आपण केलेल्या आम्लेटविषयी सांगितलं होतं.

‘कोरोना विरुद्ध लढा यशस्वी करण्यासाठी लॉकडाऊनमध्ये घरीच राहा. आवडत्या छंदाला वेळ द्या. आज मी घरी आम्लेट तयार केले. किचनमध्ये अनेक वर्षांनी वेळ दिला.’ असं रामदास आठवलेंनी लिहिलं होतं. व्हिडिओमध्ये आठवलेंच्या पत्नी सीमा आठवले आणि मुलगाही दिसतात. (Ramdas Athawale clicks photo of Son Jeet Athawale on Helicopter Ride Indapur Mumbai)

गो कोरोना, कोरोना गो

‘गो कोरोना, कोरोना गो’ अशा घोषणा देतानाचा रामदास आठवलेंचा एक व्हिडिओ गेल्या वर्षी व्हायरल झाला होता. कोरोनाचे संकट दूर व्हावे म्हणून मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे एका प्रार्थनासभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला उपस्थित असलेले आठवले आपल्या खास शैलीत ‘गो करोना’च्या घोषणा देत होते.

संबंधित बातम्या :

रामदास आठवलेंनी घेतला बिबळ्या पँथर दत्तक

‘लॉकडाऊन’मध्ये रामदास आठवलेंनी तयार केला ‘हा’ खास पदार्थ

(Ramdas Athawale clicks photo of Son Jeet Athawale on Helicopter Ride Indapur Mumbai)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.