सुशांतची हत्या झाली नाही असं AIIMS बोलू शकत नाही : रामदास आठवले

रामदास आठवले यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात एम्स (AIIMS) सुशांतची हत्या झाली नाही असं बोलू शकत नाही, असं मत व्यक्त केलं आहे.

सुशांतची हत्या झाली नाही असं AIIMS बोलू शकत नाही : रामदास आठवले
Follow us
| Updated on: Oct 07, 2020 | 4:03 PM

मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात एम्स (AIIMS) सुशांतची हत्या झाली नाही असं बोलू शकत नाही, असं मत व्यक्त केलं आहे (Ramdas Athawale on Sushant Singh death case and Mumbai Police). यावेळी त्यांनी त्यांच्यावर होत असलेल्या मुंबई पोलिसांच्या बदनामाच्या आरोपावरही सारवासारव केली. आम्ही सरकारविरोधात कोणतीही रणनीती आखली नव्हती. आमचा मुंबई पोलिसांवर विश्वास होता. ते केवळ सुशांत प्रकरणाचा तपास धीम्या गतीने करत असल्याचा आमचा आरोप होता, असं रामदास आठवले म्हणाले.

रामदास आठवले म्हणाले, “अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या बाबतीत अनेक प्रश्न समोर आले होते. सीबीआयच्या हाती सुद्धा काही मिळत नाहीये. एम्स आपल्या रिपोर्टमध्ये हत्या झाली नाही असं बोलू शकत नाही. आम्ही सरकारबाबत कोणतीही रणनीती केली नाही. आमचा मुंबई पोलिसांवर विश्वास आहे, मात्र सुशांत सिंह प्रकरणाचा तपास त्यांनी धीम्या गतीने केला. आम्ही सरकारच्या विरोधात काहीही केलेले नाही. राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी आम्ही कोणतेही प्रश्न विचारले नाहीत. आम्ही सरकारला बदनाम करण्याचं काम केलं नाही. रियाला जामीन मिळाला ते ठीक आहे, मात्र मनोरंजन इंडस्ट्रीमध्ये ड्रग्सचा वापर करु नये.”

“मी हाथरसमध्ये जाऊन त्या पीडित कुटूंबाची भेट घेतली आणि त्यांना 5 लाख रुपयांची मदत केली. योगी सरकारने सीबीआय तपासाची शिफारस केली आहे. जी घटना झाली आहे त्यामध्ये तरुणीची मान आणि मनका तुटलेला होता. अशा घटनांचं राजकारण करु नये. राजस्थानमध्ये अशा घटना होत असताना राहुल गांधी तेथे का आंदोलन करत नाहीत?”, असाही सवाल रामदास आठवले यांनी विचारला.

‘नटींच्या भीडमध्ये नाही, कार्यकर्त्यांच्या गर्दीत’

शिवसेना खासदार संजय राऊत यांना उत्तर देताना रामदास आठवले म्हणाले, “मी कंगनाला मानवतेच्या दृष्टीने विचार करुन पाठिंबा दिला. कंगना जे बोलली आहे त्याचं मी समर्थन करत नाही. मी हाथरसमध्ये जाऊन आलो आता संजय राऊत कधी जाणार आहेत? मी नट्यांच्या गर्दीमध्ये नाही, तर कार्यकर्त्यांच्या गर्दीत राहतो. संजय राऊत यांनी अशा प्रकारची वक्तव्य करु नयेत, ते माझे मित्र आहेत.”

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना रामदास आठवले म्हणाले, “शरद पवार माझे चांगले मित्र आहेत. मी जी भूमिका मांडतो ती ते गांभिर्याने घेतात. त्यांच्या टीकेवर मी काही उत्तर देणार नाही. कोणाला माझी भूमिका आवडत असेल अथवा नसेल.”

संबंधित बातम्या :

नटीच्या घराची कौलं उडवली तरी आंदोलन, हाथरस प्रकरणानंतर आठवले कुठे गेले? संजय राऊतांचा निशाणा

रामदास आठवलेंचा आमदार-खासदार तरी आहे का? आठवलेंच्या ऑफरवर पवारांच्या कानपिचक्या

दलित अत्याचाराविरुद्ध कधीही आवाज न उठवणाऱ्या संजय राऊत यांनी आम्हाला शिकवू नये : रामदास आठवले

Ramdas Athawale on Sushant Singh death case and Mumbai Police

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.