AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसला आणखी एक धक्का, रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा भाजपात प्रवेश

मुंबई : भाजपने काँग्रेसला आणखी एक धक्का दिलाय. सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश करण्यात आला. स्थानिक नगरसेवक, रणजित सिंह यांचे मोठे बंधू समशेर सिंह नाईक निंबाळकर आणि इतर नगरसेवकांनीही भाजपात प्रवेश केला. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, कॅबिनेट मंत्री विनोद तावडे, मंत्री […]

काँग्रेसला आणखी एक धक्का, रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा भाजपात प्रवेश
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM
Share

मुंबई : भाजपने काँग्रेसला आणखी एक धक्का दिलाय. सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश करण्यात आला. स्थानिक नगरसेवक, रणजित सिंह यांचे मोठे बंधू समशेर सिंह नाईक निंबाळकर आणि इतर नगरसेवकांनीही भाजपात प्रवेश केला. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, कॅबिनेट मंत्री विनोद तावडे, मंत्री सुभाष देशमुख, राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची उपस्थिती होती.

शनिवारी करमाळा येथे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह शिवसेना आमदार नारायण पाटील आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांचे चुलत भाऊ धैर्यशील मोहिते पाटील यांची भाजप प्रवेशाबाबत बैठक पार पडली होती. सध्या माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून फलटणचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रणजित हे शिवसेनेचे माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे सुपुत्र असून फलटणचे राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचे कट्टर विरोधक अशी त्यांची ओळख आहे.

पाहा व्हिडीओ :

कोण आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर?

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी याआधी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष पद भूषविले आहे. सातारा काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी मागील दोन महिन्यांपूर्वी त्यांची नियुक्ती झाली असून माढा लोकसभा मतदारसंघात स्वराज दूध संघ आणि हिंदुराव नाईक निंबाळकर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून गावागावात त्यांचं नेटवर्क उभं आहे.

फलटण नगरपालिकेत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली 9 नगरसेवक, तसेच फलटण पंचायत समितीत 2 सदस्य आणि सातारा जिल्हापरिषदेत 1 सदस्य कार्यरत आहे. यामुळे या पुढील काळात माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे संजय मामा शिंदे आणि भाजपमधून रणजितसिंह नाईक निंबाळकर अशी दोघांची लढत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राष्ट्रवादीने माढ्याची लढत प्रतिष्ठेची केली आहे. पण अगोदर मोहिते पाटील घराणं आणि यानंतर फलटणमधील निंबाळकर घराणं भाजपाच्या बाजूने असल्यामुळे आणखी चुरस निर्माण झाली आहे.

भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.