सोलापूरच्या उपमहापौरांची अधिकाऱ्यांना शिवीगाळ?, खंडणीचा गुन्हा दाखल

लोकमंगल समूहाच्यावतीनं आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यासाठी ई टॉयलेट कचरापेट्या आणि अन्य साहित्याची व्यवस्था करण्यासाठी राजेश काळे यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

सोलापूरच्या उपमहापौरांची अधिकाऱ्यांना शिवीगाळ?, खंडणीचा गुन्हा दाखल
Follow us
| Updated on: Dec 30, 2020 | 11:43 AM

सोलापूर: भाजप नेते आणि सोलापूर महापालिकेतील भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश काळे यांनी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, उपायुक्त धनराज पांडे, विभागीय अधिकारी निलकंठ मठपती यांना काळे यांनी शिवीगाळ केल्याचा आरोपही करण्यात येतोय. (Ransom case against BJP deputy mayor of Solapur)

उपमहापौर राजेश काळे यांनी नियमबाह्य कामांसाठी अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याचं बोललं जात आहे. माजी मंत्री सुभाष देषमुख यांच्याशी संबंधित लोकमंगल समुहाच्यावतीनं आयोजित सामुहिक विवाह सोहळ्यासाठी ई टॉयलेट कचरापेट्या आणि अन्य साहित्याची व्यवस्था करण्यासाठी राजेश काळे यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

प्रशासकीय मान्यतेशिवाय पालिकेची मालमत्ता कुठेही पाठवता येणार नाही. ई – टॉयलेट कचरापेट्या आणि इतर साहित्याची व्यवस्था करण्यासाठी पत्रव्यवहार करणं अपेक्षित असल्याचं पालिका अधिकाऱ्यांचं मत आहे. त्यावरुन संतापलेल्या उपमहापौर राजेश काळे यांनी पालिका आयुक्त, उपायुक्त, विभागीय अधिकारी यांना फोन करुन शिवीगाळ केल्याचं बोललं जात आहे.

बेकायदेशीर कामासाठी राजेश काळे अनेक दिवसांपासून पालिका अधिकाऱ्यांवर दबाव आणत होते. असा आरोप अनेक अधिकाऱ्यांकडून सातत्याने करण्यात येत होता. त्यानुसार आता सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याबाबत अद्याप राजेश काळे यांची बाजू समोर आलेली नाही.

सोलापूर महापालिका सभेत गोंधळ

स्थानिक स्वराज संस्थांच्या सर्वसाधारण सभेत नेहमी सत्ताधारी आणि विरोधकांच्यामध्ये वादावादी पाहायला मिळते. मात्र, सोलापूर महानगरपालिकेच्या सभेत सत्ताधारी नगरसेवकानेच खुर्ची भिरकावल्याची घटना समोर आली आहे. सोलापूर महापालिकेत भाजपची सत्ता आहे. भाजपच्या नगरसेवकाने पालिका सदस्यांच्या सभेत खुर्ची भिरकावल्याचा प्रकार 15 डिसेंबरला घडला.

नागरिकांच्या प्रश्नाकडं सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष?

सोलापूर शहरातील नागरिकांवर महापालिकेने शासनाच्या सूचनेनुसार स्वच्छता उपयुक्तता कर लावला आहे. त्याची अंमलबजावणी सप्टेंबर महिन्यापासून सुरू करण्यात आली आहे. नागरिकांना आता युजर चार्ज बरोबर सहाशे ते 18 हजार रुपयापर्यंत कर लावला जात आहे. मात्र असं असताना सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत, अशी चर्चा सुरु आहे. शहरातील गाळ्यांच्या बाबतीत मध्यरात्रीपर्यंत पार्टी मीटिंगमध्ये चर्चा होते. मात्र, नागरिकांच्या हितापेक्षा स्वःताला महत्त्व देण्याच्या सत्ताधारी भाजपचा लोकांकडून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

संबंधित बातम्या:

सोलापूर महापालिका सभेत गोंधळ, सत्ताधारी नगरसेवकानं खुर्ची भिरकावली

राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनानिमित्त नागपूर महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सायकलवारी!

Ransom case against BJP deputy mayor of Solapur

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.