कृषी विधेयक शेतकरी हिताचं, अस्तित्वासाठी विरोधकांचं आंदोलन, दानवेंचा पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा
महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी नुकतंच केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. (Raosaheb Danve Criticism Sharad Pawar)
नवी दिल्ली : “शेतकरी कृषी बिल हे शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. महाराष्ट्रात आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी विरोधक आंदोलन आणि उपोषण करण्याची भाषा करतात,” अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला. (Raosaheb Danve Criticism Sharad Pawar)
नुकतंच महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी नुकतंच केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. कृषी भवन येथे ही भेट झाली. यावेळी या दोघांमध्ये साखर उद्योग, कृषी विधेयक बिलावर चर्चा झाली. या चर्चेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही टीका केली.
“राज्यसभेत कृषीविधेयक मंजूर करण्यात आले आहे. शेतकरी कृषी बिल हे शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. महाराष्ट्रामध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी विरोधक आंदोलन आणि उपोषण करण्याची भाषा करतात,” असे रावसाहेब दानवे म्हणाले.
“एम एस पीच्या आधारावरच शेतकऱ्यांकडून मालाची खरेदी करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचा माल खरेदी करताना MSP जरी बंधनकारक नसेल परंतु एम एस पी च्या खाली शेतकऱ्यांकडून माल खरेदी करावा असे कुठे लिहिलं आहे का?” असा सवाल रावसाहेब दानवेंनी विरोधकांना विचारला.
दरम्यान शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत कृषी विधेयकावरुन राज्यसभेत झालेल्या गोंधळावर आपली भूमिका मांडली. कृषी विधेयक नियमाच्या विरुद्ध आहे, असं सदस्य सांगत होते. पण त्यांना प्रतिसाद देण्यात आला नाही. त्यामुळे सदस्यांनी वेलमध्ये धाव घेऊन नियमांचं पुस्तक दाखवण्याचा प्रयत्न केला. या गोंधळात हे पुस्तक फाडलं गेलं, असे पवार म्हणाले.
किमान सदस्य काय नियम सांगत आहेत. हे ऐकून घेण्याची अपेक्षा उपाध्यक्षांकडून होती. पण त्यांनी कुणाचंही ऐकलं नाही. त्यांनी तातडीने आवाजी मतदान घेऊन हे विधेयक मंजूर केलं. सदस्यांशी चर्चा न करता हे मतदान घेण्यात आलं. गेल्या ५० वर्षांत पीठासीन अधिकाऱ्याचं असं वर्तन मी पाहिलं नाही, अशी टीका करतानाच या विधेयकावर हवी तशी चर्चा होऊ दिली नाही. सत्ताधाऱ्यांनी घडू दिली नाही. त्यामुळे हे शेतकरी विरोधी विधेयक तात्काळ रद्द करण्यात यावं, अशी मागणी पवारांनी केली आहे. (Raosaheb Danve Criticism Sharad Pawar)
संबंधित बातम्या :