मुख्यमंत्रिपदाचं न दिलेलं आश्वासन आठवतं, पण शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाचा विसर, दानवेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

"मुख्यमंत्रिपदाचं न दिलेलं आश्वासन लक्षात. मात्र, शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन विसरले," असा हल्लाबोल दानवे यांनी शिवसेनेवर केला.

मुख्यमंत्रिपदाचं न दिलेलं आश्वासन आठवतं, पण शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाचा विसर, दानवेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
Follow us
| Updated on: Nov 29, 2020 | 5:32 PM

औरंगाबाद :उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचं न दिलेलं आश्वासन लक्षात आहे. मात्र, शेतकऱ्यांना दिलेले आश्सासन ते विसरले,” असा हल्लाबोल केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी उद्धव ठाकरेंवर त्यांचे नाव न घेता केला. ते औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. 28 नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. या निमित्ताने दानवे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केलं. (Raosaheb Danve criticizes shiv sena and Uddhav Thackeray)

“निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीत असलेल्या प्रत्येक पक्षाचा जाहीरनामा वेगळा होता. प्रत्येकाचं आश्वासन वेगळं होतं. निवडणुकीनंतर यांचं कृत्रिम सरकार आलं. निवडणुकीनंतर हे पक्ष एकत्र आले. आमचा मित्रपक्ष आम्हाला सोडून काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेला. मित्रपक्षानं जाताना सांगितलं की भाजपनं मुख्यमंत्रिपदाचं आश्वासान दिलं होतं. मुख्यमंत्र्यांना हे लक्षात राहतं, पण शेतकऱ्यांना मदत करण्यासंबंधी दिलेलं आश्वासन लक्षात राहीलं नाही. शिवसेनेने बागायती शेतीसाठी 50 हजार तर कोरडवाहू शेतीसाठी 25 हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. हे सगळं ते विसरले,” असं दानवे म्हणाले. तसेच, यावेळी बोलताना आम्ही शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचं कुठलंही आश्वासन दिलं नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

महिलांवरील अत्याचारांत वाढ

यावेळी बोलताना, त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर सडकून टीका केला. राज्यात महिलांवरील अत्याचारांत वाढ झाल्याचं ते म्हणाले. “या सरकारची कामगिरी पूर्णपणे असमाधानकार आहे. राज्यात महिलांवरील अत्यांचारांत वाढ होत आहे. पनवेलमध्ये बलात्काराची घडना घडली. बुलडाणा, जळगाव, मंठा, मुंबई येथे महिलांवर छेडछाड, बलात्काराच्या घटना घडल्या. वरील घटनांवरुन सरकारचं महिलांप्रतीचं धोरण उदासीन असल्याचं स्पष्ट होतं, असा आरोप त्यांनी ठाकरे सरकारवर केला.

मराठा आरक्षणाचा केंद्राशी  संबंध नाही

मराठा आरक्षण हा राज्याचा कायदा आहे. याचा केंद्राशी काहीही संबंध नाही. पण तरीही केंद्राकडे बोट दाखवलं जात आहे, असे म्हणत दानवे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारला घेरलं. तसेच, राज्य सरकार सुप्रीम कोर्टात सहकार्य करत नसल्याची माहिती अ‌ॅड. मुकूल रोहतगी यांनी दिलेली आहे, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या :

फडणवीसांनी करुन दाखवलं, पण त्याला नावं ठेवली, सत्तेत आहात तर करुन दाखवा, उदयनराजे आक्रमक

‘मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवता येत नसेल तर देवेंद्र फडणवीसांच्या हाती सत्ता द्या, मी जबाबदारी घेतो’, उदयनराजेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल

मंडल आयोग लागू करताना मराठा समाजाचा विचार का झाला नाही; उदयनराजेंचा सवाल

(Raosaheb Danve criticizes shiv sena and Uddhav Thackeray)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.