Video : रावसाहेब दानवेंची अपघातग्रस्तांना मदत, ताफा थांबवत जखमींना रुग्णालयात पोहोचवण्याचीही व्यवस्था

रावसाहेब दानवे यांच्या ताफ्यासमोरच जालना-बदनापूर रोडवर दुचाकीस्वाराचा अपघात झाला. त्यावेळी दानवे यांनी आपला ताफा थांबवला आणि अपघातग्रस्ताला रुग्णालयात पोहोचवण्याची व्यवस्था केली.

Video : रावसाहेब दानवेंची अपघातग्रस्तांना मदत, ताफा थांबवत जखमींना रुग्णालयात पोहोचवण्याचीही व्यवस्था
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंची अपघातग्रस्तांना मदत
Follow us
| Updated on: Jun 11, 2021 | 11:17 PM

जालना : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आपल्या बोलीवरुन नेहमीच चर्चेत असतात. आपल्या बिनधास्त अंदाजात ते राज्यातील आणि देशातील राजकारणावर आपली भूमिका मांडत असतात. त्यांनी मांडलेली भूमिका नेहमीच चर्चेचा विषय ठरते. अशा रावसाहेब दानवे यांनी आज आपला ताफा थांबवत अपघातग्रस्तांना मदत केलीय. आपल्या नियोजित दौऱ्यावर जात असताना रावसाहेब दानवे यांच्या ताफ्यासमोरच जालना-बदनापूर रोडवर दुचाकीस्वाराचा अपघात झाला. त्यावेळी दानवे यांनी आपला ताफा थांबवला आणि अपघातग्रस्ताला रुग्णालयात पोहोचवण्याची व्यवस्था केली. (Two-wheeler accident in front of Raosaheb Danve’s convoy, Danve helps injured)

आपल्या मतदारसंघातील कोरोनामुळे मृत्यू जालेल्या कुटुंबाच्या सांत्वनपर भेटीसाठी रावसाहेब दानवे दौऱ्यावर होते. या दौऱ्यावर असताना जालना-बदनापूर रोडवर दानवे यांच्या ताफ्यासमोरच एका दुचारीस्वाराचा अपघात झाला. त्यावेळी दानवे यांनी आपला ताफा थांबवला. त्यांनी जखमींची विचारपूस केली आणि आपल्या ताफ्यातील एका पोलीस गाडीत जखमींना बसून जालना इथं उपचारासाठी पाठवून दिलं. तसंच जखमींच्या नातेवाईकांनाही अपघाताची माहिती दिली. दानवेंच्या या कृतीचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

कोण आहेत रावसाहेब दानवे?

रावसाहेब दानवे यांचा जन्म 18 मार्च 1956 रोजी जालन्यातील जवखेडा खुर्द या गावात झाला. रावसाहेब दानवे हे कला शाखेचे पदवीधर (B.A.) आहेत. निर्मला दानवे या त्यांच्या पत्नी असून या दाम्पत्याला तीन मुली आणि एक मुलगा आहे.

रावसाहेब दानवे यांचा राजकीय प्रवास

जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार असलेले रावसाहेब यांचा 30 वर्षांचा राजकीय प्रवास अत्यंत रंजक आहे. त्यांनी गावच्या सरपंचपदापासून ते केंद्रीय मंत्री अशी वाटचाल केली आहे. 1990 ते 1995 आणि 1995 ते 1999 या दोन टर्ममध्ये ते भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते.

त्यानंतर 1999 साली रावसाहेब दानवे यांनी पहिल्यांदा जालना लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली आणि ती जिंकलीही. सलग 5 वेळा जालना मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेले आहेत. संसदेच्या विविध समित्यांवर त्यांना कामाचा अनुभव आहे. यामध्ये वाणिज्य, संसदीय स्थायी समिती, संसदीय सल्लागार समिती, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू संसदीय समिती आणि कृषी या समित्यांचा समावेश आहे.

2014 मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर रावसाहेब दानवे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली. मात्र, एकनाथ खडसे यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे राजीनामा दिल्याने नऊ महिन्यांतच रावसाहेब दानवे महाराष्ट्रात परतले होते. त्यानंतर दानवे यांच्या भाजप प्रदेशाध्यक्षपद सोपवण्यात आले होते. तर 2019 मध्ये पुन्हा एकदा रावसाहेब दानवे यांची मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली होती.

संबंधित बातम्या : 

Special Story: पवारांना प्रशांत किशोर भेटले, मोदींना उद्धव, कोण कुणीकडे कशासाठी का जातंय? समजून घ्या 10 पॉईंट्समधून!

गाव कोरोनामुक्त ठेवणारच, 19 जिल्ह्यातील सरपंचांकडून मुख्यमंत्र्यांना विश्वास

Two-wheeler accident in front of Raosaheb Danve’s convoy, Danve helps injured

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.