जिवाचं काही बरं वाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार – नारायण राणे

भाजप नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत राज्य सरकारने कपात केली आहे. त्यावरुन आता जोरदार राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे.

जिवाचं काही बरं वाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार - नारायण राणे
नारायण राणे, भाजप नेते
Follow us
| Updated on: Jan 10, 2021 | 2:52 PM

रत्नागिरी: विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजप खासदार नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक भाजप नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत राज्य सरकारने कपात केली आहे. त्यावरुन आता जोरदार राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे. सुरक्ष्या व्यवस्थेत कपात करण्यात आल्यानंतर माझ्या जिवाचं काही बरं वाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार असेल, अशी प्रतिक्रिया भाजप खासदार नारायण राणे यांनी दिलीय. (Narayan Rane criticizes state government for cutting security)

“राज्य सरकारने माझी सुरक्षा कालच काढली. मला केंद्र सरकारची सुरक्षा आहे. अतिरेक्यांपासून माझ्या जिवाला धोका असल्यामुळे मुंबई पोलिसांनी सुरक्षा दिली होती. पण राज्य सरकताने माझ्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केली आहे. त्यामुळे जर माझ्या जिवाला धोका निर्माण झाला तर त्याला राज सरकार जबाबदार असेल”, असं नारायण राणे यांनी म्हटलंय.

अमृता फडणवीसांच्या सुरक्षेत कपात

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना वायप्लस एस्कॉर्टसह सुरक्षा देण्यात आली होती. ही सुरक्षा काढून त्यांना एक्स सुरक्षा देण्यात आली आहे. दिविजा फडणवीस यांचीही वायप्लस एस्कॉर्टसह सुरक्षा काढून एक्स सुरक्षा देण्यात आली आहे. तसेच दीपक केसरकर यांची वायप्लस सुरक्षा काढून वाय, आशिष शेलार आणि राम नाईक यांची वायप्लस सुरक्षा काढून त्यांनाव वाय सुरक्षा देण्यात आली आहे. तर रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांना वायप्लस एस्कॉर्टसह सुरक्षा होती. त्यात कपात करून आता त्यांना वायप्लस सुरक्षा देण्यात आली आहे.

दानवे, मुनगंटीवार, बडोलेंची सुरक्षा रद्द

अंबरीशराव अत्राम, चंद्रकांत पाटील. संजय बनसोडे, सुधीर मुनगंटीवार, नारायण राणे, रावसाहेब दानवे, राजकुमार बडोले, हरिभाऊ बागडे, राम कदम, प्रसाद लाड, मोरोतराव कोवासे, शोभाताई फडणवीस, कृपाशंकर सिंह आणि माधव भंडारी आदी नेत्यांना देण्यात आलेली वायप्लस एस्कॉर्टसह, वायप्लस, वाय आणि एक्स दर्जाची सुरक्षा रद्द करण्यात आली आहे.

सुरक्षा काढण्याची परंपरा भाजपचीच- सत्तार

राज्य सरकारकडून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह भाजपच्या अनेक बड्या नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात करण्यात आली आहे. त्यावरुन शिवसेना नते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपवर जोरदार पलटवार केलाय. सुरक्षा काढण्याची परंपरा भाजपचीच आहे आणि त्यांची सुरक्षा काढली नाही तर कमी केल्याचं अब्दुल सत्तार म्हणाले.

संबंधित बातम्या:

फडणवीस, राज ठाकरे, चंद्रकांतदादांच्या सुरक्षेत कपात; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

राणे, चंद्रकांतदादांची वाय प्लस सुरक्षा रद्द; आठवलेंना एस्कॉर्टशिवाय वायप्लस सुरक्षा

Narayan Rane criticizes state government for cutting security

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.