उद्धव ठाकरे सोलगावमध्ये दाखल, बारसूत स्थानिकांशी चर्चा करणार; रिफायनरी विरोधातील आंदोलनाची पुढची काय?
Uddhav Thackeray at Solagoan : उद्धव ठाकरे यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद; रिफायनरी प्रकल्पाबाबत काय बोलणार?
बारसू : बारसूत होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाविरोधात स्थानिकांनी आंदोलन केलंय. त्यांच्या बोलण्यासाठी त्यांची बाजू जाणून घेण्यासाठी उद्धव ठाकरे बारसूमध्ये जात आहेत. उद्धव ठाकरे सोलगावमध्ये दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे सोलगावमध्ये दाखल झाले, तेव्हा स्थानिकांनी त्यांचं स्वागत केलं. कोण आला रे कोण आला? महाराष्ट्राचा वाघ आला अशा घोषणा देण्यात येत आहेत.
उद्धव ठाकरे म्हणाले…
सोलगावमध्ये पोहोचल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी स्थानिकांशी संवाद साधला. लोकांचा विरोध असल्यास रिफायनरी होणार नाही, असा शब्द उद्धव ठाकरे यांनी स्थानिकांना दिला आहे. चांगले प्रकल्प असल्यास ते गुजरातला आणि ज्या प्रकल्पांमुळे वाद निर्माण होतोय ते प्रकल्प माझ्या कोकणाच्या माथी मारले जात आहेत. हे खपवून घेणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
हुकुमशाही लादण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा पेटवून टाकू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे.
पोलिसांना बाजूला ठेवून रिफायनरीच्या समर्थनासाठी येऊन दाखवा, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे आणि नितेश राणे यांना दिलं आहे.
उद्धव ठाकरे बारसूमध्ये जात असल्याने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या गाड्या ज्या मार्गाने जाणार आहेत. ते रस्ते पोलिसांकडून दगड टाकून बंद करण्यात आले आहेत. बारसूमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. बारसूकडे जाणारे रस्ते पोलिसांनी बंद केले आहेत.
रिफायनरीच्या बाजूने आंदोलन
तर तिकडे राजापूरमधल्या जवाहर चौकात रिफायनरी समर्थक एकत्र जमणार आहेत. तिथं ते प्रकल्पाच्या बाजूने घोषणाबाजी करत आहेत. केंद्रीयमंत्री नारायण राणे,उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार नितेश राणे,निलेश राणे या मोर्चात सहभागी होणार होते. मात्र काही कारणास्तव नारायण राणे आणि उदय सामंत हे सहभागी होणार नाहीत. निलेश, नितेश राणे ,प्रमोद जठार हे या मोर्चाचं नेतृत्व करतील. सिंधुदुर्गातून राणे समर्थक मोठया संख्येने या आंदोलनात सहभागी होत आहेत.