AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bachchu Kadu on Rana : ‘निवडणुकीवेळी तुमचा बाप वेगळा होता आता तो बदलला’, बच्चू कडू यांची राणा दाम्पत्यावर जहरी टीका

रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या या आव्हानावर बोलताना प्रहार संघटनेचे नेते आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जहरी टीका केलीय. निवडणुकीच्या वेळी तुमचा बाप वेगळा होता आणि आता तुमचा बाप बदलला आहे, असा शब्दात बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर निशाणा साधलाय.

Bachchu Kadu on Rana : 'निवडणुकीवेळी तुमचा बाप वेगळा होता आता तो बदलला', बच्चू कडू यांची राणा दाम्पत्यावर जहरी टीका
बच्चू कडू यांची राणा दाम्पत्यावर टीकाImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 22, 2022 | 4:39 PM
Share

अमरावती : राज्यात सध्या मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसाच्या (Hanuman Chalisa) मुद्द्यावरुन जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्याचवेळी मशिदींसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावण्याचे आदेशही मनसैनिकांना दिले आहेत. अशावेळी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा यांनीही थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं. राणा दाम्पत्य आज मुंबईत दाखल झालं आणि त्यांनी उद्या सकाळी 9 वाजता मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा वाचणारच, असं आव्हान त्यांनी पुन्हा एकदा दिलंय. रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या या आव्हानावर बोलताना प्रहार संघटनेचे नेते आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जहरी टीका केलीय. निवडणुकीच्या वेळी तुमचा बाप वेगळा होता आणि आता तुमचा बाप बदलला आहे, असा शब्दात बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर निशाणा साधलाय.

बच्चू कडूंचा राणा दाम्पत्यावर घणाघात

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर बच्चू कडू यांनी जोरदार हल्ला चढवला. निवडणुकीच्या वेळी तुमचा बाप वेगला होता आणि आता तुमचा बाप बदलला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेऊन राणा निवडून आले आहेत, हे विसरू नका. रवी राणा आणि नवनित राणा विकासाचा मुद्दा सोडत आहेत. प्रहार संघटना शिवसेनेसोबत आहे, आम्ही शिवसैनिकांसोबत आहोत. रवी राणा यांची तेवढी उंची नाही, ते मातोश्रीवर जाणार नाहीत, असा दावाही बच्चू कडू यांनी केलाय.

राणा दाम्पत्याचं शिवसेनेला आव्हान

आम्ही कोणत्याही परिस्थितीत मातोश्रीसमोर हनुमान चालिसा वाचणार आहोत. आम्ही उद्या सकाळी 9 वाजता मातोश्रीवर जाणार. कायदा सुव्यवस्थेचं पालन करणार, पोलिसांना सहकार्य करणार. बाळासाहेब ठाकरे असते तर एकदा नाही शंभरवेळा हनुमान चालिसा वाचण्याची परवानगी दिली असती. मी दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं. मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केलं. मात्र, मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची दिवाळी काळी केली. मला मातोश्रीवर जाताना अटक केली, तुरुंगात टाकलं. मला आजही अमरावतीत बंदी करण्यात येणार होतं, तसे पोलिसांना आदेश होते. सरकार तुमचं आहे. तुम्ही आम्हाला आत टाकाल. पण जय श्रीराम आणि बजरंग बलीचं नाव घेण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकणार नाही. आम्ही गोंधळ करणार नाही. कायदा व सुव्यवस्था बिघडवू देणार नाही, असं रवी राणा म्हणाले. त्याचबरोबर माझ्या कार्यकर्त्यांना आवाहन आहे की तुम्ही येऊ नका, असं आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलंय. त्याचबरोबर बाळासाहेबांचे सैनिक असतील तर माझ्यासमोर येऊन हनुमान चालिसा वाचतील, असा टोलाही राणा यांनी शिवसैनिकांना लगावलाय.

संजय राऊत शिवसेनेचे पोपट, नवनीत राणांचं प्रत्युत्तर

आता निवडणुका नाहीत त्यामुळे हा स्टंट नाही. निवडणुकीच्या तोंडावर केलं असतं तर स्टंट समजला गेला असता. मी त्यांच्याच उमेदवाराला पाडून निवडून आले आहे, त्यामुळे मला कुणी शिकवू नये. 16-16 तास काम केल्यानंतर मला जनतेनं निवडून दिलं आहे. संजय राऊतांना मी पोपटचं म्हणते. ते सकाळी सकाळी बोलत असतात. त्यांच्या बोलण्यात काही तथ्य नाही. आम्ही भाजपच्या बाजूने आहेत असं ते म्हणत असले तरी त्यात तथ्य नाही. तुम्ही आम्हाला बोलता मग तुम्ही कुणाच्या भरवश्यावर निवडून आलाय. मोदींच्या फोटोवर मते मिळाली. येणाऱ्या काळात गोव्यात मिळाली तेवढीच मते मिळतील, असा जोरदार टोलाही नवनीत राणा यांनी शिवसेनेला लगावलाय.

इतर बातम्या :

Navneet Rana and Ravi Rana : राणा दाम्पत्य उद्या सकाळी 9 वाजता मातोश्रीवर जाणार, राणा दाम्पत्य ठाम; शिवसेना काय भूमिका घेणार?

Navneet Rana in Mumbai : मी मुंबईची मुलगी, विदर्भाची सून, मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणण्यावर नवनीत राणा ठाम, उद्याचा मुहूर्त

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.