Maharashtra Vidhan Parishad Election : आमदार रवी राणांविरोधात जामीनपात्र वॉरंट; विधान परिषद निवडणुकीच्या आधी चर्चांणा उधाण

दुसरीकडे सोमवारी विधान परिषदेसाठी मतदान होणार आहे. सर्वच राजकीय पक्ष हे एका एका मतासाठी धावपळ करत आहेत. अशाच भाजपचं एक मत हुकणार का? असा सवाल आता उपस्थित झालाय.

Maharashtra Vidhan Parishad Election : आमदार रवी राणांविरोधात जामीनपात्र वॉरंट; विधान परिषद निवडणुकीच्या आधी चर्चांणा उधाण
आमदार रवी राणा यांच्याविरोधात अटक वॉरंटImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 18, 2022 | 8:37 PM

मुंबई : राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत असताना आत्ताच एक मोठी अपडेट आलीय. भाजपचे सहयोगी आमदार आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या विरोधात जामिनपात्र वॉरंट जारी करण्यात आलंय. अमरावतीचे महापालिका आयुक्त यांच्यावरील शाईफेक प्रकरणात हे वॉरंट काढण्यात आलं आहे. एवढेट नाही तर आमदार राणा यांच्या घरी अमरावती पोलीस (Amravati Police) पोहोचले हो, मात्र आमदार रवी राणा घरी नसल्याने वॉरंट (Baileble Warrant) कुणीही स्वीकारलं नाही. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. तर दुसरीकडे सोमवारी विधान परिषदेसाठी मतदान होणार आहे. सर्वच राजकीय पक्ष हे एका एका मतासाठी धावपळ करत आहेत. अशातच हे वॉरंट आल्याने अनेक राजकीय चर्चांणा उधाण आलं आहे. गेल्या काही दिवसात राणा दाम्पत्य विरुद्ध राज्य सरकार हा संघर्ष तर महाराष्ट्राने पाहिलाच आहे.

रवी राणा यांची पहिली प्रतिक्रिया

या वॉरंटबाबत आमदार रवी राणा यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचा हा दबाव आहे. विधानपरिषद निवडणुकीत मी भाजपला मतदान करू नये यासाठी हे सर्व सुरू आहे. तसेच मुंबई पोलिस आयुक्त व अमरावती पोलीस आयुक्त यांच्या माध्यमातून पोलीस खार मधील घरी आले होते. मला पोलीस शोधत आहेत. पण मी कायदेशीर उत्तर देईन, तसेच भाजपचे उमेदवार निवडून यावे यासाठी मी पूर्ण ताकद लावेन, असे रवी राणा म्हणाले आहेत.

पुढच्या तारखेला हजर राहवे लागणार

आमदार रवी राणा यांच्यावर आयुक्तांवरील शाईफेक प्रकरणात कलम 353, 307 या कलमांतर्गत राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. आणि अत्ता याच प्रकरणात जामीनपत्र वॉरंट कोर्टाने काढलं आहे. त्यामुळेच पुढच्या तारखेला रवी राणा यांना कोर्टात हजर व्हावे लागेल हे आता स्पष्ट झालं आहे. हे शाईफेकीचे प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून गाजत आहे. अमरावतीतील पुतळ्यावरून सुरू झालेला हा वाद आता कोर्टापर्यंत पोहोचला आहे. काही दिवसांपूर्वीच राणा यांना जामीन मंजूर करत कोर्टाने दिलासा दिला होता. त्यामुळे काही राणा यांना अटकेपासून संरक्षण मिळाले होते. आत्ता पुढच्या तारखेला काय निर्णय कोर्टाकडून येतो, त्यावरही बऱ्याच घडमोडी अलंबून असणार आहेत.

नेमका  वाद कसा पेटला?

अमरावतीतल्या एका चौकात पुतळा बसवण्यात आला होता. हा पुतळा बेकायदेशील असल्याचे सांगत पालिकेने हा पुतळा रातोरात हटवला. त्यानंतर राणा दाम्पत्य हे चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी कार्यकर्त्यांसह जोरदार आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी त्यांची धरपकड केली होती. तेव्हापासून अमरावतीचे पालिका आयुक्त आष्टीकर आणि रवी राणा यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू होते. याचेच रुपांतर पुढे शाईफेक प्रकरणात झालं. त्यानंतर मात्र राणा यांच्या अडचणी वाढतच गेल्या. राणा यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर राणा यांनी हे राजकीय षडयंत्र असल्याचा आणि आपल्याला या प्रकरणात गोवण्यात येत असल्याचाही आरोप वारंवार केला आहे. तेव्हापासूनच राणा विरुद्ध शिवसेना हाही संघर्ष वाढला आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.