Navneet Rana : नवणीत राणा, रवी राणांचा मतोश्रीबाहेर हनुमान चालीस पठणाचा मुहूर्त ठरला, 22 एप्रिल ही तारीख जाहीर

आमदार रवी राणा यांनी मातोश्रीबाहेर जाऊन हनुमान चालीसा पठणाचा इशारा दिला होता. त्यावर जोरदार प्रतिक्रिया उमटत होत्या. मात्र आता त्यांचा मातोश्रीवर जाण्याचा आणि हनुमान चालीसा वाचण्याचा मुहूर्तही ठरला आहे. 22 एप्रिलला राणा मातोश्रीसमोर जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Navneet Rana : नवणीत राणा, रवी राणांचा मतोश्रीबाहेर हनुमान चालीस पठणाचा मुहूर्त ठरला, 22 एप्रिल ही तारीख जाहीर
राणांचा हनुमान चालीसा पठणाला मातोश्रीबाहेर जाण्याचा मुहूर्त ठरलाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 6:17 PM

अमरावती : आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी मातोश्रीबाहेर जाऊन हनुमान चालीसा पठणाचा इशारा दिला होता. त्यावर जोरदार प्रतिक्रिया उमटत होत्या. मात्र आता त्यांचा मातोश्रीवर जाण्याचा आणि हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) वाचण्याचा मुहूर्तही ठरला आहे. 22 एप्रिलला राणा मातोश्रीसमोर जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. खासदार नवनीत राणाही (Navneet Rana) सोबत उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे. विदर्भ एक्स्प्रेसने रवी राणा हे मुंबईत पोहोचणार असल्याचेही सांगण्यात आले. तसेच कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सतत नवनीत राणा आणि रवी राणा हे महाविकास आघाडी आणि शिवसेनेला टार्गेट करत आहेत. सरकार मला खोट्या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतंय असा आरोपही काही दिवसांपूर्वीच राणा यांच्याकडून करण्यात आला होता.

रवी राणा काय म्हणाले?

राज्यात सध्या हिंदूत्व आणि हनुमान चालीस विरुद्ध मशीदीवरील भोंगे हा संघर्ष तापला आहे. राज ठाकरे यांनी यांनी घेतलेल्या भूमिकेला भाजपसह अनेकांना पाठिंबा दिला आहे. सध्या पूर्ण राज्यात अस्थिरता माजली आहे, या सगळ्या संकटातून मुक्त करण्यासाठी हनुमान चालीसा पठण होणे गरजेचे आहे. हा पाठ मातोश्रीवर वाचल्यास खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे विचार खोलवर रुजतील. आता महाविकास आघाडीची हनुमान चालीसा वाचण्याची परवानगी घ्यावी लागते ही खंत आहे.  मात्र महाराष्ट्र सध्या संकटात आहे, त्यासाठी हे होणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया यावर रवी राणा यांनी दिली आहे. जे विरोध करत आहेत त्यांनाही माझी विनंती आहे की महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी हनुमान चालीसा वाचण्यासाठी ही काळाची गरज झाली आहे, असेही राणा म्हणाले.

वार पलटवार सुरूच

मातोश्री हे बाळासाहेबांची तीर्थक्षेत्र आहे. तर हनुमान चालीसा वाचण्याला एवढा विरोध का? फक्त सत्तेसाठी हिंदुत्वापासून फारकत घेतली का? असा सवालही रवी राणा यांनी विरोध करणाऱ्या शिवसेनेला केला आहे. रवी राणा यांना त्यांच्या गावात कोण विचारत नाही. म्हणून इथे त्यांची प्रतीष्ठा वाढवण्यासाठी ते येत आहेत. अनेक लोकांना हे हकलून लावतात, लोकांची कामं  हे करत नाही, असे म्हणत शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी राणा यांच्यावर पलटवार केला आहे. राज्यात ज्या पद्धतीने काम सुरू आहे. त्याचे देशभर कौतुक होत आहे आणि आता राणा काय शिकवत आहेत? असा सवाल त्यांनी केला आहे.

Jahangirpuri Encrochment : हा बुलडोजर धर्म बघत नाही? दिल्लीतल्या अतिक्रमण हटाव मोहीमेत मंदीराचं अतिक्रमणही हटवलं

Gunratna Sadavarte: कबुल, कबुल, कबुल! गुणरत्न सदावर्तेंनी 1, 44,00000 एवढे पैसे एस.टी. कर्मचाऱ्यांकडून घेतले? हिशेब वाचा

Jahangirpuri Encrochment : अतिक्रमण हटवताना दिल्लीतल्या जहांगिरपुरीत भेदाभेद? मशिदीसमोरच्या अतिक्रमणावरही बुलडोजर

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.