Ravi Rana : मुंबईतलं अनाधिकृत बांधकाम 15 दिवसात बांधकाम पाडण्याचे बीएमसीचे आदेश, रवी राणांची पहिली प्रतिक्रिया
"जर तुमचं म्हणणं आहे की, कुठेतरी आम्ही अनधिकृतपणे काम केलं आहे. हे बांधकाम आम्ही नाही केलेलं. आम्हाला ज्या बिल्डरने ते घर विकलं, तसं बिल्डींगमधील प्रत्येक व्यक्तीला घर विकलेलं आहे. समजा त्या बिल्डींगमध्ये पंचवीस लोक राहतात तर तिथल्या पंचवीस लोकांना बिल्डरने घर विकलं आहे.
नवी दिल्ली – “मला असं वाटतंय की, मुंबई महापालिकेने (BMC) त्या बिल्डींगला (Building) परवानगी दिली आहे. ज्या बिल्डींगला मुंबई महापालिकेने परवानगी दिली ती शिवसेनेकडे (shivsena) सध्या शिवसेनेकडे आहे. महापालिकेचं सगळं काम अनेक वर्षापासून शिवसेना पाहत आहे. खार परिसरात त्या लाईनीत जेवढ्या बिल्डींग आहेत. त्या एकाच बिल्डरने बांधलेल्याा आहेत. म्हणून त्या सगळ्या बिल्डींगची मोजमाप महानगर पालिकेने करावी, की ज्या बिल्डींगला तुम्ही परवानगी दिली, तुमची सत्ता होती. तुमचे महापौर होते. तुम्हीचं मोजमाप करता. आम्हाला ज्या बिल्डरने फ्लॅट विकला. तसा तिथल्या दहा ते पंधरा बिल्डींमध्ये राहत असलेल्या लोकांना बिल्डरने घर विकलं आहे” अशी रवी राणांनी (Ravi Rana) पहिली प्रतिक्रिया दिली.
तिथल्या सगळ्या इमारतींना महानगर पालिकेने परवानगी दिली
“जर तुमचं म्हणणं आहे की, कुठेतरी आम्ही अनधिकृतपणे काम केलं आहे. हे बांधकाम आम्ही नाही केलेलं. आम्हाला ज्या बिल्डरने ते घर विकलं, तसं बिल्डींगमधील प्रत्येक व्यक्तीला घर विकलेलं आहे. समजा त्या बिल्डींगमध्ये पंचवीस लोक राहतात तर तिथल्या पंचवीस लोकांना बिल्डरने घर विकलं आहे. त्यामध्ये आम्ही सुध्दा राहतो. तिथल्या सगळ्या इमारतींना महानगर पालिकेने परवानगी दिली आहे. आत्ता मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून जे आमच्या घराचं मोजमाप होत आहे. ते आम्हाला त्यांच्या महानगर पालिकेने परवानगी दिलेलं घर आम्ही घेतलेलं आहे. आम्हाला महानगपालिकेने फसवलं आहे. माझं असं म्हणणं आहे की, मी एखाद्या बिल्डरकडून घर घेतलं. एक सर्वसामान्य माणूस म्हणून आमच्या आयुष्यातलं आम्ही एक घर घेतलं. त्या बिल्डरला तुम्ही परवानग्या दिल्या आहेत”अशी टीका त्यांनी रवी राणा यांनी पालिकेच्या कारभारावरती केली.
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलल्यानंतर कारवाई होते
“त्या बिल्डरने आम्हाला फसवलं आहे. कुठेतरी तुम्ही सुध्दा त्या माध्यमातून आम्हाला फसवलं आहे. त्यामध्ये मी कुठेही अनधिकृत काम केलेलं नाही. जर त्या घरात तुम्हाला कुठेतरी अनधिकृत काम केलं असं वाटतं असेल तर पालिकेने खुशाल कारवाई करावी. तसेच जो काही आम्हाला दंड येईल त्याचं आम्ही पालन करू. तिथल्या सगळ्या बिल्डींगचं तुम्ही मोजमाप करणार आहे का ? सरकारच्या विरोधात कोणी बोलेलं, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कोण बोलेलं त्यांना अशा कारवाईंना सामोरे जावे लागते.
आत्तापर्यंत नारायण राणे, मोहित कंबोज यांच्या घराचं त्यांनी मोजमाप केलं. मुख्यमंत्री महाराष्ट्रात द्वेशाचं राजकारण करीत आहे. तुम्ही महागाईवरती बोला, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडा असा टोला नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.