Sangli : शहाजी बापूंचे मंत्रिमद ओक्केमध्येच..! सदाभऊ खोतांची भर सभेत घोषणा, विमान प्रवासावरुन बापूंवर टोलेबाजी..सर्वकाही..!
बंडखोर आमदारांच्या भूमिकेनंतर महाविकास आघाडी सरकार हे कोसळले असले तरी बंडाची सुरवात शहाजी बापू पाटील आणि शंभूराजे देसाई यांनी केली होती. सर्वात आगोदर या दोघांचे पाय सुरतेला लागल्याचे शहाजी बापूंनी यापूर्वीच सांगितले. मात्र, सुरतेकडे सुरु झालेला प्रवास गुवाहटी आणि नंतर गोवा असा झाला.
सांगली : (Shivsena) शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या भूमिकेनंतर आता राज्यात सत्तांतर होऊन (Eknath Shinde) शिंदे सरकारची स्थापनाही झाली आहे. सरकार कामालाही लागले आहे पण सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटलांचा तो डायलॉगची क्रेज आजही कायम आहे. या डायलॉगमुळे मराठी भाषा ही सातासमुद्रा पार गेली असून आता (Shahaji Patil) शहाजी बापूंना मंत्रिपदही मिळणार असल्याचा विश्वास सदाभऊ खोत यांनी व्यक्त केला आहे. शिवाय गुवाहटी ते गोवा प्रवास आणि त्यानंतर कोसळलेले सरकार यावरुनही या दोघांमध्ये जुगलबंदी रंगली होती. क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने आयोजित कार्यक्रमाते सदभाऊ खोत आणि शहाजी पाटील हे दोघेही एकत्र आले होते. यावेळी गुवाहटीमधील किस्से आणि सध्या राज्य सरकारने घेतलेले निर्णय कसे हिताचे आहेत हे देखील शहाजी बापू पाटील आणि सदाभऊ खोत यांनी पटवून सांगितले.
सदाभऊंनी व्यक्त केली इच्छा
मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडलेला असला तरी याबाबत अनेकजण इच्छूक आहेत. याबाबत सदाभाऊ खोत यांनी यापूर्वीही आपण इच्छूक असल्याचे सांगितले होते. तर क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्यांनी आपली इच्छा बोलून दाखवली आहे. शिवाय शहाजी बापू पाटलांचे तर मंत्रिपद ओक्केच असल्याचे सदाभऊ यांनी सांगितले. मात्र, तुम्हाला मंत्रिपद मिळाल्यानंतर आमचाही विचार करा असा टोलाही त्यांनी लगावला. यापूर्वीही सदाभऊ खोत यांनी मंत्रिपदाबाबत आपण इच्छूक तर आहोतच पण ग्रामीण भागाशी निगडीत पद मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली होती.
अन् सरकार पाडूनच पाटील वाळव्याला..
बंडखोर आमदारांच्या भूमिकेनंतर महाविकास आघाडी सरकार हे कोसळले असले तरी बंडाची सुरवात शहाजी बापू पाटील आणि शंभूराजे देसाई यांनी केली होती. सर्वात आगोदर या दोघांचे पाय सुरतेला लागल्याचे शहाजी बापूंनी यापूर्वीच सांगितले. मात्र, सुरतेकडे सुरु झालेला प्रवास गुवाहटी आणि नंतर गोवा असा झाला. ज्या उद्देशाने शिवसेनेच्या आमदरांनी हा निर्णय घेतला तो उद्देश साध्य करुनच शहाजी बापू हे वाळवा गावाला दाखल झाले असल्याचे सदाभऊ खोत यांनी सांगितले आहे. दरम्यानच्या काळात शहाजी बापू पाटलांची भूमिका महत्वाची राहिल्याचेही त्यांनी सांगितले.
दोघेच कारभारी पण विकास कामाचा धडाका
सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सरकार चालवत आहेत. दोन माणसावर चांगले काम सध्या महाराष्ट्र मध्ये सुरु आहे .दोन वाडपे व्यवस्थित वाढत असतील तर 40 जणांची काय गरज आहे असा विनोदही ही खोत यांनी केला. सरकार नसल्यावर लय वाईट परिस्थिती असते. सत्ता असताना माणसाची घरासमोर 1 किलोमीटर सकाळी सकाळी रांग असायची. सत्ता गेल्यावर मात्र सगळी गर्दी गायब झाली असेही खोत म्हणाले.