‘म्हणे फडणवीसांना अटक करा, अटक मटक चवळी चटक वाटलं की काय?’ चित्रा वाघ यांनी उडवली चाकणकरांची खिल्ली
भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी चाकणकरांची जोरदार खिल्ली उडवली आहे. फडणवीसांना अटक करणं म्हणजे अटक मटक चवळी चटक वाटलं की काय? असा खोचक सवाल चित्रा वाघ यांनी विचारलाय.
मुंबई : रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या पुरवठ्यावरुन राज्यात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात जोरदार राजकारण रंगलंय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप करत फडणवीसांना अटक करण्याची मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलीय. त्यावरुन आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी चाकणकरांची जोरदार खिल्ली उडवली आहे. फडणवीसांना अटक करणं म्हणजे अटक मटक चवळी चटक वाटलं की काय? असा खोचक सवाल चित्रा वाघ यांनी विचारलाय. (Chitra Wagh criticizes Rupali Chakankar)
“उठले कि निघाले आरोप करायला आता काय तर म्हणे देवेंद्र फडणवीस यांना अटक करा. अटक मटक चवळी चटक वाटलं कि काय? रेमडेसिव्हीर राज्यसरकारलाचं देणार होते. संबंधीत मंत्र्यांशी CSसाहेबांशी बोलणं झालेलं. माहिती तर घ्यायची आधी. सरकार म्हणतं सहकार्य करा. आम्ही करत आहोत व करणारचं पण या बावळटांना आवरा रे” असं ट्वीट करत चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांच्या मागणीची खिल्ली उडवली आहे.
उठले कि निघाले आरोप करायला आता काय तर म्हणे @Dev_Fadnavis ना अटक करा अटक मटक चवळी चटक वाटलं कि काय?#Remdesivir राज्यसरकारलाचं देणार होते संबंधीत मंत्र्यांशी CSसाहेबांशी बोलणं झालेलं..माहिती तर घ्यायची आधी सरकार म्हणतं सहकार्य करा आम्ही करत आहोत व करणारचं पण या बावळटांना आवरा रे
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) April 19, 2021
गृहमंत्री वळसे-पाटलांनाही आव्हान
दरम्यान, पोलिसांवर दबाव टाकणं सहन केलं जाणार नाही, असं गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटलं होतं. एकप्रकारे त्यांनी भाजप नेत्यांना इशाराच दिलाय. त्यावरुनही चित्रा वाघ यांनी गृहमंत्र्यांना आव्हान दिलंय. “गृहमंत्री जी ब्रूक फार्मा कंपनीच्या संचालकांना कुठल्या मंत्र्याच्या OSD ने फोन करून धमकावलं तो मंत्री कोण ? त्याने का आणि कुणाच्या सांगण्यावरून धमकावलं?, ह्याची ही माहिती पोलिसांनी आपल्याला दिलीचं असेल, ते ही सांगा महाराष्ट्राच्या जनतेला”, असं ट्वीट वाघ यांनी केलं आहे.
गृहमंत्री जी ब्रूक फार्मा कंपनीच्या संचालकांना कुठल्या मंत्र्याच्या OSD ने फोन करून धमकावलं तो मंत्री कोण त्याने का आणि कुणाच्या सांगण्यावरून धमकावलं ह्याची ही माहिती पोलिसांनी आपल्याला दिलीचं असेल ते ही सांगा महाराष्ट्राच्या जनतेला @Dwalsepatil @Dev_Fadnavis @mipravindarekar https://t.co/IzbxQxJ7zo
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) April 18, 2021
फडणवीसांना अटक करा- चाकणकर
रेमडेसिविर इंजेक्शन्सचा साठा केल्याचा संशय असलेल्या ब्रूक फार्माच्या मालकाच्या पोलीस चौकशीवर आक्षेप घेणारे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी कामात अडथळा आणून त्रास दिला, असा आरोप चाकणकर यांनी केला. त्या सोमवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना अटक करा, अशी मागणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे केली. त्यामुळे आता गृहमंत्री यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सन्माननीय गृहमंञी, काल रात्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या काही साथीदारांनी मिळून पोलिसांवर दबाव निर्माण करून एका गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला.
वास्तविक पाहता, गुन्हा करणारा जितका दोषी असतो तितकाच दोषी गुन्हेगाराला पाठीशी घालणारा असतो. दोन्ही आरोपींना
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) April 18, 2021
संबंधित बातम्या :
केंद्र सरकारविरोधात अफवा पसरवली, नवाब मलिकांविरोधात भातखळकरांची पोलिसांत तक्रार
Chitra Wagh criticizes Rupali Chakankar