Breaking | धनंजय मुंडे प्रकरण, तक्रारदार महिला पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये दाखल
धनंजय मुंडे यांच्याविरोधात तरुणीने ओशिवरा पोलीस ठाण्यात 10 जानेवारीला तक्रार केली. याप्रकरणी 11 जानेवारीला रोजी मुंबई पोलिसांकडून अर्ज स्वीकारण्यात आला.
मुंबई: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दिलेली महिला पुन्हा एकदा पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. रेणू शर्मा असं या महिलेचं नाव असून त्या डी.एन. नगर पोलिस ठाण्यात पोहोचल्या आहेत. डी.एन. नगर विभागाच्या सहाय्यक पोलिस आयुक्तांची त्या भेट घेणार आहे. आपल्यासोबत झालेल्या प्रकरणाची माहिती संबंधित महिला सहाय्यक पोलीस आयुक्तांना देणार आहे. याआधी रेणू शर्मा यांनी ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.(Renu Sharma reached the police station again)
ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार
रेणू शर्मा नावाच्या एका गायिकेनं धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. मुंडे यांनी आपल्याला बॉलिवूडमध्ये संधी देण्याचं आणि लग्नाचं आमिष दाखवून सातत्यानं बलात्कार केल्याचा आरोप या तरुणीने केला आहे. धनंजय मुंडे यांच्याविरोधात तरुणीने ओशिवरा पोलीस ठाण्यात 10 जानेवारीला तक्रार केली. याप्रकरणी 11 जानेवारीला रोजी मुंबई पोलिसांकडून अर्ज स्वीकारण्यात आला. तरुणीने केलेल्या आरोपांनुसार 2006 पासून अत्याचार सुरु असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर आपली बाजू सविस्तरपणे मांडली आहे.
रेणू शर्मा कोण आहे?
रेणू शर्मा असे या धनंजय मुंडेंविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेचे नाव आहे. रेणू शर्मा या एक गायिका आहेत. रेणू अशोक शर्मा असे त्यांचे संपूर्ण नाव आहे. “रेणू शर्मा यांच्या दाव्यानुसार, रेणू शर्मा आणि धनंजय मुंडे यांची ओळख 1997 मध्ये झाली. रेणू शर्मा आणि धनंजय मुंडे हे मध्यप्रदेशातील इंदोरमध्ये बहिण करुणा शर्मा यांच्या घरी भेटले.
त्यावेळी रेणू शर्मा यांचे वय 16-17 इतके होते. धनंजय मुंडे आणि करुणा या दोघांचा 1998 मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर 2006 मध्ये करुणा या प्रसूतीसाठी इंदोरमध्ये गेली होती. त्यावेळी रेणू घरात एकटी आहे, हे धनंजय मुंडेना माहिती होतं. त्यावेळी धनंजय मुंडे काहीही न सांगता रात्री घरी आले आणि त्यांनी माझ्या इच्छेविरुद्ध माझ्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
धनंजय मुंडे दर दोन-तीन दिवसांनी माझ्या घरी यायचे आणि शाररिक संबंध प्रस्थापित करायचे. याबाबतचा एक व्हिडीओही काढला होता. यानंतर धनंजय मुंडे यांनी मला वारंवार फोन करत प्रेम करत असल्याची कबुली दिली. तसेच मला सांगितले की जर तुला गायिका बनायचे असेल, तर मी तुला बॉलिवूडच्या मोठ्या मोठ्या दिग्दर्शक निर्मांत्याशी भेटवेन. तुला बॉलिवूडमध्ये लाँच करेन. या नावाखाली धनंजय मुंडेंनी इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवला. तसेच माझी बहिण घराबाहेर असतानाही धनंजय मुंडेंनी माझ्यावर शाररिक संबंध प्रस्थापित केले.” अशी तक्रार रेणू शर्मा हिने केली आहे.
I have lodged complaint of Rape @MumbaiPolice @CPMumbaiPolice against #DhananjayMunde no action till now @PawarSpeaks @supriya_sule @UdhavThackeray . Oshiwara police station is not even accepting my written complaint @Dev_Fadnavis my life is in threat please help @narendramodi pic.twitter.com/mf4ZlHxd6A
— renu sharma (@renusharma018) January 11, 2021
संबंधित बातम्या:
नैतिकता महत्त्वाची, धनंजय मुंडे प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांचं मोठं भाष्य
Renu Sharma reached the police station again