Shirdi : महसूल मंत्रीपद पुन्हा नगर जिल्ह्याकडेच, दोन मंत्र्यामध्ये फरक काय दाखवून देऊ, सुजय विखेंचे थेट आव्हान
गेल्या 35 वर्षापासून राधाकृष्ण विखे-पाटील हे राजकीय क्षेत्रात आहेत. मात्र, पक्षातील अंतर्गत मतभेदानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला पण सरकार हे महाविकास आघाडीचे स्थापन झाले होते. अखेर शिंदे सरकारच्या काळात का होईना त्यांचे 35 वर्षातील योगदानाचे फलीत झाल्याचे सुजय विखे पाटील यांनी सांगितले आहे. तर मंत्रिपद देखील मागून नाही आणि खाते पक्षश्रेष्ठींच्या आदेशानेच मिळाले आहे.
शिर्डी : अपेक्षेप्रमाणे (Minister of Revenue Minister) महसूल मंत्रीपद हे ज्येष्ठ नेते (Radhakrishna Vikhe-Patil) राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडेच गेले आहे. खाते कोणतेही असो मंत्रिमंडळात समावेश ही मोठी बाब असून जनतेच्या विकास कामावर लक्ष केंद्रीत करणार असे मंत्रिमंडळाचा विस्तार होताच राधाकृष्ण विखे-पाटील यांनी स्पष्ट केले होते. पण महसूल खाते त्यांना मिळाल्याने पुन्हा हे खाते (Nagar District) अहमदनगर जिल्ह्यातच राहिले आहे. यापूर्वी संगमनेर मतदार संघातील बाळासाहेब थोरात यांच्याकडे हे खाते होते तर आता संगमनेरला लागूनच असलेल्या शिर्डी मतदार संघात हे खाते गेले आहे. मात्र, दोन्ही महसूल मंत्र्यात काय फरक असतो हे दाखवून देणार असल्याचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे विकासाच्या बाबतीत आजी-माजी मध्ये स्पर्धा लागली तर फायदा मात्र, सर्वसामान्य जनतेचा होणार हे निश्चित.
राजकारणातील 35 वर्षातील फलीत
गेल्या 35 वर्षापासून राधाकृष्ण विखे-पाटील हे राजकीय क्षेत्रात आहेत. मात्र, पक्षातील अंतर्गत मतभेदानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला पण सरकार हे महाविकास आघाडीचे स्थापन झाले होते. अखेर शिंदे सरकारच्या काळात का होईना त्यांचे 35 वर्षातील योगदानाचे फलीत झाल्याचे सुजय विखे पाटील यांनी सांगितले आहे. तर मंत्रिपद देखील मागून नाही आणि खाते पक्षश्रेष्ठींच्या आदेशानेच मिळाले आहे. त्यामुळे त्यांचा विश्वास आणि जनतेची कामे हाच उद्देश राहणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले आहे. संवैधानिक दृष्टीकोनातून फार उच्च खात आहे. त्याचा सर्वसामान्य जनतेला कसा फायदा होईल यावरच लक्ष असणार असेही विखे पाटील म्हणाले आहेत.
भाजपामध्ये सन्मान अन् न्यायही
गेल्या 35 वर्षाच्या काळात एवढा सन्मान मिळाला नाही तो भाजपाच्या काळात मिळाल्याचे डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले आहे. कार्यक्षमता ओळखून न्याय मिळालाच नाही. आता संधी मिळाली असून त्याचे सोने केले जाणार आहे. विकासकामावरुनच दोन महसुलमंत्र्यांमध्ये काय फरक असतो हे आम्ही दाखवून देऊ असे म्हणत त्यांनी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना टोला लगावला आहे. मंत्रिपद आणि खाते देऊन भाजपाने मान ही दिला आणि न्यायही मिळाला असल्याची भावना डॉ.सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे.
काय असणार आहेत आव्हाने?
सर्व सामान्यांना रेशनकार्ड , डोलसाठी , सातबारा , इतर हक्कासाठी नाव सोडवणे यासारखी कामे करावी लागणार आहेत. वाळू माफियांचा विळखा अधिक घट्ट होत असून त्यावर अंकूश घालावे लागणार आहे. जो पर्यंत हा भ्रष्टाचार बंद होत नाही तोपर्यंत सामान्य जनतेवरचा दबाव कमी होणार नसल्याचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले आहे. तर फायद्यासाठी पक्ष बदलण्याचा आरोप करतात त्यांनाही कामातून उत्तर द्यायचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे.