Amravati : महाविकास आघाडी सरकारच्या काळातच घडल्या दंगली, अनिल बोंडेंनी दिले स्पष्टीकरण

खासदार अनिल बोंडे यांनी महाविकास आघाडीच्या प्रयोगामुळे सर्वसामान्य जनतेला तर काही मिळाले नाही, पण याकूबच्या कबरीचे उदात्तीकरण, राज्यात घडलेल्या दंगली यामुळे हा प्रयोग जनतेला कधीच पटला नाही. जनतेच्या मनात नसताना हे सरकार सुरु होते. अखेर अडीच वर्षानंतर जनतेच्या मनातील सरकार सत्तेत आले आहे.

Amravati : महाविकास आघाडी सरकारच्या काळातच घडल्या दंगली, अनिल बोंडेंनी दिले स्पष्टीकरण
खा. अनिल बोंडे
Follow us
| Updated on: Sep 10, 2022 | 10:07 PM

अमरावती : राज्यात शिंदे सरकारची स्थापना होऊन आता अडीच महिन्याचा कालावधी लोटला आहे. ज्या पद्धतीने सत्तांतर झाले ते सर्व जनतेने उघड्या डोळ्याने बघितले असले तरी यामागची कारणे काय आहेत ते (Politics Leader) राजकीय नेते पटवून देत आहेत. (Anil Bonde) माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी वेळोवेळी महाविकास आघाडी सरकारवर बोचरी टीका केला आहे. महाविकास आघाडीचा प्रयोग हा अनपेक्षित तर होताच पण तो जनतेला देखील न पटणारा होता.हा प्रयोग (Yakub Memon) याकूब मेमनच्या कबरीच्या उदात्तीकरण करणारा असल्याची घणाघती टीका त्यांनी महाविकास आघाडीवर केली आहे. त्यामुळे सत्तांतराच्या अडीच महिन्यानंतर आरोप-प्रत्यारोप हे सुरुच आहेत.

महाविकास आघाडीवर हल्लाबोल

खासदार अनिल बोंडे यांनी महाविकास आघाडीच्या प्रयोगामुळे सर्वसामान्य जनतेला तर काही मिळाले नाही, पण याकूबच्या कबरीचे उदात्तीकरण, राज्यात घडलेल्या दंगली यामुळे हा प्रयोग जनतेला कधीच पटला नाही. जनतेच्या मनात नसताना हे सरकार सुरु होते. अखेर अडीच वर्षानंतर जनतेच्या मनातील सरकार सत्तेत आले आहे. त्यामुळे आता सर्वकाही सुरळीत होत असल्याचे बोंडे यांनी सांगितले आहे.

वरुण सरदेसाईंनाही सल्ला

वरुण सरदेसाई यांनी युवा सेनेच्या मेळाव्यात भाजपासह शिंदे गटावर सडकून टिका केली आहे. त्यांच्या या मनोगतावरुन संजय राऊतांच्या त्यांची नेमणूक केली जाऊ शकते असेही बोंडे म्हणाले आहेत. संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या ताब्यात आहेत. त्यामुळे सकाळी बोलण्यासाठी शिवसेनेला एका प्रवक्त्याची गरज असून ती गरज सरदेसाई यांच्या रुपाने भरुन निघेल असा टोलाही त्यांनी लगावला.

मविआ च्या काळातच अधिकच्या दंगली

याकूब मेमन याच्या कबरीवरील रोषणाईवरुन सध्या भाजप आणि शिवसेनेत आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. मात्र, याकूबच्या कबरीचे उदात्तीकरण महाविकास आघाडी सरकारच्या काळातच झाले आहे. एवढेच नाहीतर याच सरकारच्या काळात अमरावती, मालेगाव आणि नांदेडमध्ये दंगली झाल्याची आठवण अनिल बोंडे यांनी करुन दिली आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.