‘तीन नद्या जोडण्याला मंजुरी, यामुळे या भागात पाण्याची समस्या मिटणार’, मोदींनी दिली महत्त्वाची माहिती

"काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सरकारने काय केलं? ते दुर्लक्ष करुन स्वत:चे खिसे भरत राहीले. जे सिंचन प्रकल्प देवेंद्र फडणवीस यांनी सुरु केलेले, आघाडीच सरकार आल्यानंतर त्यांनी ब्रेक लावला. महायुतीच सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर सिंचनासह योजनांना गती मिळाली" असं पीएम मोदी म्हणाले.

'तीन नद्या जोडण्याला मंजुरी, यामुळे या भागात पाण्याची समस्या मिटणार', मोदींनी दिली महत्त्वाची माहिती
नरेंद्र मोदी, पंतप्रधानImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Nov 09, 2024 | 2:06 PM

“अकोला कापूस उत्पादनासाठी ओळखला जातो. कापूस टेक्सटाईल इंडस्ट्रीचा मोठा आधार आहे. पण कापूस शेतकऱ्याला अनेक दशकं या शेतीचा लाभ मिळाला नाही. ही परिस्थिती बदलतेय. कापूस शेतकऱ्यांच उत्पादन वाढवण्यासाठी उद्योग आणि इन्फ्रास्ट्रक्चर दोघांना प्रोत्साहन दिलं जातय” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते अकोला येथे निवडणूक प्रचारसभेत बोलत होते. “मी महाराष्ट्रात टेक्सटाईल पार्कची पायाभरणी केलीय. या टेक्सटाईल पार्कमुळे महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी समृद्धीच्या नवीन संधी निर्माण होतील. शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत, त्याची जननी काँग्रेस आहे” असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

“महाराष्ट्रात इतकी वर्ष काँग्रेसच सरकार होतं. विदर्भात पाणी संकट वाढत गेलं. काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सरकारने काय केलं? ते दुर्लक्ष करुन स्वत:चे खिसे भरत राहीले. जे सिंचन प्रकल्प देवेंद्र फडणवीस यांनी सुरु केलेले, आघाडीच सरकार आल्यानंतर त्यांनी ब्रेक लावला. महायुतीच सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर सिंचनासह योजनांना गती मिळाली” असं पीएम मोदी म्हणाले.

‘आमचा संकल्प आहे, की…’

“वैनगंगा, नलगंगा आणि पैनगंगा या नद्या जोडण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेमुळे अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम, नागपूर, वर्धा येथील पाण्याची समस्या दूर होईल. यासाठी 90 हजार कोटी रुपये खर्च आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. “पूर आणि दुष्काळ या समस्या संपवण्यासाठी आमच्या सरकारने हजारो कोटी रुपये दिले आहेत. महाराष्ट्राच्या या भागात पाण्याची समस्या दूर होईल. उत्पादन सुधारेल. आम्ही शेतकऱ्यांना कमी पाणी वापरण्याच आवाहन करुन सिंचनासाठी प्रोत्साहन देत आहोत. आमचा संकल्प आहे, शेतकऱ्यांनी इतकं सशक्त झालं पाहिजे की, ते देशाच्या प्रगतीचे नायक बनले पाहिजेत” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ‘खर्च कमी करुन उत्पादन वाढवण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे’ असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.