“विहीरीत जीव देईल पण मी काँग्रेसमध्ये येणार नाही!”, पक्षांतराच्या ऑफरवर गडकरीचं ठाम उत्तर

Nitin Gadkari: एका मुलाखतीदरम्यान नितीन गडकरी यांनी एक किस्सा सांगितला. यात आपल्याला काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर आली असल्याचं त्यांनी सांगितलं. काय म्हणालेत गडकरी? पाहा...

विहीरीत जीव देईल पण मी काँग्रेसमध्ये येणार नाही!, पक्षांतराच्या ऑफरवर गडकरीचं ठाम उत्तर
Follow us
| Updated on: Aug 30, 2022 | 9:52 AM

मुंबई: नितीन गडकरी… भाजपमधलं एक असं नाव ज्यांचे सगळ्याच पक्षांशी अन् त्यातील नेत्यांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. पक्ष कुठचाही असो, एकदा मित्र झाला की तो गडकरींच्या फ्रेंडलिस्टमध्ये कायमचा जोडला जातो. पण कितीही जवळची मैत्री झाली, काहीही झालं तरी गडकरींनी पक्षाशी कधीही प्रतारणा केली नाही. आधी पक्ष मग मैत्री, नातेसंबंध याच तत्वाशी ते काय बांधलेले आहेत. त्याचाच प्रत्यय गडकरींनी सांगितलेल्या एका किस्स्यातून येतो. एका मुलाखतीदरम्यान आपल्याला काँग्रेसमध्ये (Congress) येण्याची ऑफर आली असल्याचं त्यांनी सांगितलं. पण त्यावर गडकरींनी (Nitin Gadkari) जे उत्तर दिलं ते एकूण पुन्हा त्यांना पक्षांतराची ऑफर देण्याची हिंमत कदाचित कुणीच करणार नाही…

नितीन गडकरी अभ्यासू, हुशार, संवेदनशील आणि समाजाभिमुख काम करणारी व्यक्ती आहे. पण ते चुकीच्या पक्षात आहेत, असं अनेकदा म्हटलं जातं. असंच बोलत काँग्रेसमधील एका मित्राने आपल्याला एका मित्राने ऑफर दिल्याचं गडकरींनी सांगितलं. “विद्यार्थीदशेत असताना मी विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व करायचो. श्रीकांत माझा चांगला मित्र आहे. त्याने मला म्हटलं की, नितीन यू आर गुड पर्सन बट राँग पार्टी! तू काँग्रेसमध्ये ये… त्यावर मी म्हटलं श्रीकांत, मी विहिरीत जीव देईल पण काँग्रेसमध्ये येणार नाही! कारण मला काँग्रेसची विचारधारा पटत नाही…”, असं गडकरी म्हणालेत.

“समाजकार्य आणि राजकारणात कधीही माणसाचा वापर केला अन् टाकून दिलं, असं करता कामा नये. चांगले दिवस असो की वाईट… ज्याचा एकदा हात पकडला त्याचा हात कायम, शेवटपर्यंत पकडून ठेवायला हवा. परिस्थितीनुसार बदलू नका. नाती जपा. वेळेनुसार मित्रांना जवळ किंवा लांब करू नका”, असं नितीन गडकरी म्हणाले आहेत.

हे सुद्धा वाचा

नागपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. काँग्रेसची ऑफर, त्याला दिलेलं ठाम उत्तर यासह अन्य मुद्द्यांवर त्यांनी आपलं मत मांडलं. या कार्यक्रमात उद्योजकही उपस्थित होते. गडकरींनी उद्योजकांशीही संवाद साधला. यावेळी बोलताना कर्मचारी आणि उद्योजक यांच्यातील संबंध कसे असावेत? याबाबत गडकरी यांनी उद्योजकांना मोलाचा सल्ला दिला आहे.

Non Stop LIVE Update
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.