जयंतरावांच्या मुख्यमंत्री महत्वकांक्षेवर काय म्हणाले रोहित पवार?
जयंत पाटलांच्या या वक्तव्यावर बोलताना राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनी जयंत पाटलांचे वक्तव्य पाहिले नासल्याचं म्हटलंय. (Rohit Pawar Jayant Patil cm)
सोलापूर : मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पाहणं हे नक्कीच दिवास्वप्न नाही. राजकारणातील शक्तीने ते हस्तगत करण्याचे उद्दिष्ट असल्याचे वक्तव्य जलसंपदामंत्री जयंत पाटील(Jayant Patil) यांनी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. जयंत पाटलांच्या या वक्तव्यावर बोलताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी त्यांचे वक्तव्य आणखी ऐकलं नसल्याचं म्हटलंय. मात्र काम करत असताना एक ताकद मिळावी असे प्रत्येकाला वाटते. मुख्यमंत्री म्हणून ही ताकद जास्त मोठी असते. आपल्या हातून लोकांची सेवा आणखी जास्त घडावी या हेतूने जयंतराव यांनी ते व्यक्तव्य केलं असावं, असा अंदाज रोहित पवार यांनी व्यक्त केला. ते सोलापुरात ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. (Rohit Pawar comment on Jayant Patil desire of becoming chief minister)
सेवा घडावी म्हणून बोलले असावेत
यावेळी बोलताना रोहीत पवार यांनी जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर भाष्य केले. “आपल्या हातून लोकांची सेवा आणखी जास्त घडावी या हेतूने जयंत पाटील असं काही बोलले असावेत. जयंतराव यांचं त्यांच्या मतदारसंघासोबतच पूर्ण राज्यात मोठं काम आहे. लोकांना केंद्रबिंदू ठेवून जयंत पाटील राज्यभर फिरत असतात. मुख्यमंत्री म्हटलं की काम करताना जास्त ताकद मिळते. जनतेची सेवा जास्त प्रमाणात करता येते. याच करणामुळे जयंत पाटील असे म्हणाले असावेत,” असे स्पष्टीकरण रोहीत पवार यांनी दिले. तसेच यावेळी बोलताना दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचं आम्हाला पार्टीने सांगितलेलं आहे, असंही रोहित पवार म्हणाले.
जयंत पाटील काय म्हणाले?
सांगली जिल्ह्यातील इस्लामपुरात जयंत पाटील एका स्थानिक माध्यमाशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली. “गेली 20 वर्ष राजकारणात सक्रिय आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहणे हे नक्कीच ‘दिवास्वप्न’ नाही, तर राजकारणातील शक्तीने हे स्वप्न हस्तगत करणं हेच आपलं उद्दिष्ट आहे,” असे जयंत पाटील म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात तर्कवितर्क लावले जात आहेत.
भाजपच्या पुण्यातील 19 नगरसेवकांच्या पक्षांतराची चर्चा, अजित पवारांचा देवेंद्र फडणवीसांच्या सुरात सूरhttps://t.co/z9VITQ6fh2#AjitPawar | #NCP | #BJP | #Devendrafadnavis | @AjitPawarSpeaks | @NCPspeaks | @BJP4Maharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 21, 2021
संबंधित बातम्या :
मीही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पाहातोय; जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट
जयंत पाटलांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पूर्ण होणार की दिवास्वप्न ठरणार?; वाचा स्पेशल रिपोर्ट
(Rohit Pawar comment on Jayant Patil desire of becoming chief minister)