नवी मुंबईत आता त्यांची ताकद राहिली नाही, रोहित पवारांचा गणेश नाईकांना टोला
एक व्यक्ती गेल्याने काहीही होत नाही, असं म्हणत रोहित पवारांनी गणेश नाईकांवर निशाणा साधला.
नवी मुंबई : “नवी मुंबईत दोन नेते आहेत. मात्र, आता (Rohit Pawar Criticise Ganesh Naik) त्यांची ताकद राहिलेली नाही”, असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी नाईक पिता-पुत्रांवर निशाण साधला. तसेच, “एक व्यक्ती गेल्याने काहीही होत नाही”, असं म्हणत राष्ट्रवादीसोडून भाजपात गेलेल्या गणेश नाईकांवर रोहित पवारांनी टीकास्त्र सोडलं.
नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे आज राष्ट्रवादीचा युवक (Rohit Pawar Criticise Ganesh Naik) मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड मंचावर उपस्थित होते.
हेही वाचा : ‘अनुभव नसताना फडणवीसांना मुख्यमंत्रीपद’, आदित्य ठाकरेंवरील दादांच्या टीकेला रोहित पवारांचं प्रत्युत्तर
आता त्यांची ताकद राहिली नाही : रोहित पवार
“राजकीय दृष्ट्या पाहिल्यांदाच मी नवी मुंबईत आलो आहे. महिन्याभरापूर्वी ज्या वक्तीला ताकद देण्यात आली होती, तेव्हा आघाडीचे सरकार होते आणि अशी व्यक्ती भाजपची सत्ता येईल म्हणून तिकडे गेली. ठीक आहे, एक व्यक्ती गेल्याने काहीही होत नाही”, असं म्हणत रोहित पवारांनी गणेश नाईकांवर निशाणा साधला.
“राज्यात जे बदल झाले, आता ते नवी मुंबईत करुन दाखवू. कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे. महाविकास आघाडीकडे जो संवाद आहे तो जाणवत आहे. आता या जिल्ह्यात दोन नेते आहेत. मात्र, त्यांची आता ताकत राहिली नाही”, असंही रोहित पवार म्हणाले.
नवी मुंबईत महाविकास आघाडीची सत्ता येईल : रोहित पवार
“सर्वसामान्यांचे आणि माथाडी कामगारांच्या समस्या काय आहे. ते शशिकांत शिंदे यांना माहिती आहेत. महापालिका म्हणून याठिकाणी कामे झाली नाही. म्हणून राष्ट्रवादी या नवी मुंबईत बदल करणार. नवी मुंबई महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता येईल”, असा विश्वासही रोहित पवार यांनी व्यक्त केला.
“मनसे मधील काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, त्यांचे स्वागत. इतर सर्वांचेही स्वागत. 1958 पासून सुरु झालेला प्रवास बघता सिडको आणि इतर गोष्टी बघता या ठिकाणी वेगळी प्लानिंग करुन रचलेले हे शहर आहे. नवी मुंबई ही मुंबई सारखी आहे. वसलेली नवी मुंबई आहे”, असं रोहित पवार या कार्यक्रमादरम्यान म्हणाले.
“महाविकास आघाडी होणार नाही, असे सर्वांना वाटत होते. परंतू, महाविकास आघाडी झाली. मतभेद होते, परंतू मतभेद बाजूला ठेऊन महाविकास आघाडी झाली.”
“मेकअप साठी नाही, तर मेकओव्हरसाठी हे बजेट होते”, अशी प्रतिक्रिया यावेळी बोलताना रोहित पवारांनी दिली. “या ठिकाणी आपल्याला हाताला काम पाहिजे कॉन्ट्रॅकसाठी नाही”, असं म्हणत रोहित पवरांनी गणेश नाईकांचे नाव न घेता टोला लगावला.
“केंद्राचे राजकारण वेगळे असते हे लोकांना माहिती आहे. पण, विधानसभेला पवार साहेबांना सोडले, पक्ष सोडून गेले. पण, पक्ष हा कुठल्या नेत्यामुळे असतो, असं नाही. पक्ष हा कार्यकर्त्यांनमुळे असतो”, असं म्हणत रोहित पवारांनी गणेश नाईक यांना टोला लगावला.
“पवार साहेबांनी गणेश नाईकांना मदत केली नाही. या ठिकाणच्या लोकांना मदत केली, विकासाला मदत केली. सर्व सामन्यांची दहशत असावी नेत्यांची नव्हे. तुमच्या हातात ताकद पाहिजे. नवी मुंबई महापालिकेच्या हाती राष्ट्रवादीची सत्ता स्थापन करण्यात येईल. जितेंद्र आव्हाड जे बोलले ते पहिल्यांदाच बघायला मिळाले”, असंही रोहित पवार म्हणाले.
पवार साहेबांमुळे नवी मुंबईचा विकास, गणेश नाईकांमुळे नाही : रोहित पवार
“मला इच्छुक उमेदवारांना सांगायचे आहे, नाराज होऊ नका. महाविकास आघाडीची सत्ता आपण या नवी मुंबई महापालिकेत स्थापन करायची आहे. परिवर्तन करायला लागेल. पैशाची ताकत मोठी की जनतेची. परिवर्तन करु, नवी मुंबईत परिवर्तन होणारच. पवार साहेबांमुळे नवी मुंबईचा विकास झाला, गणेश नाईकांमुळे नाही”, असं म्हणत रोहित पवारांनी गणेश नाईकांवर खोचक टीका केली.
नवी मुंबईत महाविकास आघाडीची सत्ता येईल : रोहित पवार
“सर्वसामान्यांचे आणि माथाडी कामगारांच्या समस्या काय आहे. ते शशिकांत शिंदे यांना माहिती आहेत. महापालिका म्हणून याठिकाणी कामे झाली नाही. म्हणून राष्ट्रवादी या नवी मुंबईत बदल करणार. नवी मुंबई महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता येईल”, असा विश्वासही रोहित पवार यांनी व्यक्त केला.
नवी मुंबईत राष्ट्रवादीचा झेंडा फडकवू, जनता आमच्या सोबत : शशिकांत शिंदे
काहीही करुन ही निवडणूक जिंकणार. नेता गेला म्हणून जनता जात नाही, असा टोला राष्ट्रवादी नेते शशिकांत शिंदे यांनी गणेश नाईकांना लगावला. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सरकारमधून नवी मुंबईत झेंडा फडकवू, जनता आमच्या सोबत आहे, असा विश्वासही (Rohit Pawar Criticise Ganesh Naik) शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.
संबंधित बातम्या :
काही गोष्टी दिसू नयेत म्हणून नेते भिंत बांधतात, रोहित पवारांचा भाजपला टोला
कोरोना इफेक्ट : हात मिळवण्यास आलेल्या व्यक्तीसमोर शरद पवारांनी हात जोडले
कोण काय बोलतं, याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही : अजित पवार
रोहित पवारांकडून व्हॅलेंटाईन डेच्या खास शुभेच्छा, म्हणाले तरुणांनो लक्षात असू द्या…